स्त्री शक्तीचा सन्मान हीच त्यांच्या कार्याची ओळख , :— वर्षाताई उगलमुगले यांचे प्रतिपादन जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कर्तुत्वान महिलांचा सत्कार..
बुलढाणा (सचिन खंडारे)प्रत्येक महिलांच्या यशस्वी कामगिरीमागे पुरुषांचा सहभाग असतो तसाच सहभाग पुरुषांच्या मागे महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे . स्त्री शक्तीचा सन्मान हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे . जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करुन त्यांच्या कार्याची ओळख निर्माण करण्याचे कार्य पत्रकारांनी केले आहे . असे प्रतिपादन जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जागदरी येथील आदर्श महिला सरपंच सौ वर्षाताई शंकरराव उगलमुगले यांनी अध्यक्षीय भाषणातून केले . यावेळी साखरखेर्डा येथील सरपंच सौ ज्योती अमित जाधव , भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर , माजी सरपंच सौ पुनम महेंद्र पाटील , वैद्यकीय अधिकारी डॉ . वैष्णवी दिनकरराव राठोड , अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पच्छीम विदर्भ उपाध्यक्ष प्रतापराव मोरे , शंकरराव उगलमुगले , वैद्यकीय अधिकारी डॉ गोपाल परिहार , अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव डी एन पांचाळ , औषध निर्माता डॉ गोपाल मानतकर उपस्थित होते . महिलांना घरकाम करुन सामाजिक , राजकीय , सेवेत असणाऱ्या महिलांना शिक्षण , आरोग्य , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर्स म्हणून काम करावे लागते . या कामात अनेक अडचणी येतात . परंतू न डगमगता त्या आपल्या कामात दिरंगाई कधीच करीत नाही . अशा महिलांचा कोठेतरी सन्मान झाला पाहिजे . त्यामुळे त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळते . असे प्रतिपादन सरपंच सौ ज्योती जाधव यांनी केले . तर सत्कार मुर्ती महिलांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल कोणी घेतली नाही . जागतिक महिला दिन केवळ एक ओळख म्हणून न राहता त्या दिवशी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान झाला पाहिजे . आम्ही खरोखरच समाजात राहून काम करीत आहोत , आमचे काम योग्य आहे की अयोग्य याचा लेखाजोखा त्यातून मांडला जातो . आजच्या सन्मान सोहळ्यात खरोखरच आम्हाला आमच्या कार्याची पावती मिळाली आहे असे प्रतिपादन आरोग्य सेविका प्रमिला कोवे , आशा वर्कर्स ज्योती दिलीप इंगळे , डॉ . वैष्णवी राठोड यांनी आपले मत मांडले . यावेळी भाग्यश्री खेडेकर यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले . जागतिक महिला दिनानिमित्त साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर , आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त वर्षाताई शंकरराव उगलमुगले , सरपंच सौ ज्योती अमित जाधव , माजी सरपंच सौ पुनम महेंद्र पाटील , वैद्यकीय अधिकारी डॉ वैष्णवी राठोड , डॉ निलीमा देशमुख , डॉ जयश्री शेळके , प्रमिला माधवराव कोवे , शांता सुखदेव वाघ , कविता विठोबा इंगळे , ज्योती दिलीप इंगळे , शिला सुधिर इंगळे , दिपाली सुपाजी पिठलोड , अस्मिता दिनकर पारधे , पुजा अशोक चव्हाण , मिनाक्षी भरत गवई , स्वाती बाबूराव डोंगरदिवे , मिना काशिनाथ बिडवे , सिध्दुबाई गाडेकर , ज्योती सुरेश चांगाडे , पुनम ज्ञानेश्वर सरकटे , वैशाली रविंद्र गवई , दिपाली विशाल डोळे , एन आर झिने , जे डि काळे , रेखा खिल्लारे , छाया संतोष गोडाले या महिलांचा सन्मान करण्यात आला . महिला दिनाचे आयोजन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे , जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे , सचिव डी एन पांचाळ , प्रसिध्दी प्रमुख समाधान सरकटे , राधेश्याम बंगाळे यांनी केले होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खंडारे यांनी केले . फोटो :—- जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिला
