गरिबीतून संघर्ष करून आईचे स्वप्न पूर्ण – पहिल्यांदाच केला विमान प्रवास

Screenshot_2026-03-09-20-23-48-35_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंखेडराजा तालुक्यातील अंचली येथील रहिवासी द्वारकाबाई रामभाऊ ससाने यांचे आयुष्य गरिबीत गेले. कष्ट, संघर्ष आणि अभाव यामध्ये आयुष्य जगताना त्यांच्या मनात एक लहानसे पण मोठे स्वप्न होते – एकदा तरी विमानात बसण्याचे.त्यांचे चिरंजीव संदीप रामभाऊ ससाने सध्या देऊळगाव राजा येथील एका खासगी बायर कंपनीत देऊळगाव राजा नोकरी करत असून, त्यांनी आपल्या आईचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी आईला पहिल्यांदाच मुंबई ते छत्रपती संभाजीनगर असा विमान प्रवास घडवून आणला. आयुष्यभर कष्ट केलेल्या आईसाठी हा क्षण खूप भावनिक आणि अविस्मरणीय ठरला.गरीबी आणि संघर्षाच्या काळातही द्वारकाबाई ससाने यांच्या मनात उंच भरारी घेण्याची स्वप्ने होती. पायात चप्पल नसतानाही, फाटकी झोळी खांद्यावर घेऊन त्यांनी आयुष्याचा प्रवास केला; पण आकाशात उडणाऱ्या विमानाकडे पाहून मनात एक आशा कायम होती.आज परिस्थितीवर मात करून जेव्हा त्या विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहत होत्या, तेव्हा त्यांना जग खूप लहान वाटत होते. ढगांमधून होणारा प्रवास, विमानाचा आवाज आणि मनात दाटून आलेल्या भावना यामुळे त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले –“फाटकी झोळी, पायात चप्पल नव्हती,आभाळाकडे बघून स्वप्ने पाहणारी डोळी होती.जमिनीवर चालताना पायाला काटे टोचले,पण आकाशात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले.कष्ट करून कमावले, रक्ताचे पाणी केले,आज परिस्थितीवर मात करून विमानात बसले.दोन फुटांच्या खिडकीतून बघताना जग लहान दिसले,गरिबीच्या अंधाराला प्रकाशाचे पंख फुटले.विमानाचा आवाज अन् ढगांमधून प्रवास,हळूच डोळ्यांत पाणी अन् मनाला लागला ध्यास.कधीकाळी स्वप्न वाटले ते आज खरे झाले,आजीच्या संघर्षाचे फळ मला आकाशातून दिसले.”आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाने केलेल्या या प्रयत्नामुळे परिसरात या घटनेची चर्चा होत असून, अनेकांनी या कुटुंबाचे कौतुक केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!