बुलढाणा पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक; १० ठिकाणी छापे, १७ आरोपी जेरबंद!

Screenshot_2026-03-11-19-24-07-83_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा( बुलढाणा माझा वृत्तसेवा) जिल्ह्यातील अवैध जुगार, वरली मटका आणि गावठी दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने जिल्ह्यातील १० वेगवेगळ्या ठिकाणी धडक कार्यवाही करत एकूण १७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत रोख रकमेसह एकूण २५,६२५/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ​जिल्ह्यात वरली मटका, तासपत्ता जुगार आणि अवैध दारू विक्रीमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये, यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर यांनी विविध स्वतंत्र पथके तयार करून जिल्ह्यात धाडसत्र राबवले.​

कुठे-कुठे झाली कारवाई?

दिनांक १० मार्च २०२६ रोजी राबवलेल्या या मोहिमेत जुगार आणि दारूबंदी कायद्यांतर्गत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली:​जुगार प्रतिबंधक कारवाई (तासपत्ता व मटका):​तामगाव (एकलारा बानोद): तासपत्ता खेळणाऱ्या सागर शंकर गिरी (३२) व इतर ५ जणांकडून ११,९९०/- रुपये जप्त.​खामगाव (शिवाजीनगर): आकाश श्याम वानखडे (२२) याच्याकडून वरली मटका साहित्य व ५,११५/- रुपये हस्तगत.​पिंपळगाव राजा (काळेगाव): भगवानसिंग सोळंके व इतर २ आरोपींकडून ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.​इतर शहरे: अंत्री खेडेकर (अंढेरा), चिखली, देऊळगाव मही, मेहकर टाऊन आणि रोहिणखेड (धामणगाव बढे) येथेही मटका बुकींवर छापे टाकून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.​अवैध दारू विक्रीवर हातोडा:​येवती (लोणार): राजेंद्र रंगनाथ डोईफोडे (६०) याच्याकडून १,२००/- रुपयांची देशी दारू जप्त.​निमगाव बु. (किनगाव राजा): समाधान पिराजी वाघुळ (२८) याच्याकडून १,२१०/- रुपयांची अवैध दारू हस्तगत.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा (खामगाव) आणि श्री. अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील अंबुलकर, सपोनि यशोदा कणसे, पोउपनि पंकज सपकाळे, प्रताप बाजड व स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी पार पाडली.​जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे या कारवाईमुळे धाबे दणाणले असून, अशा कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

You may have missed

error: Content is protected !!