बुलढाणा पोलिसांचे मोठे यश; २०२५ मध्ये हरवलेल्या ८७% महिलांचा लावला शोध!​’मिसिंग डेस्क’ आणि ‘मिसिंग सेल’चा राज्यभरात पॅटर्न; २८४ प्रलंबित प्रकरणांसाठी शोधमोहीम तीव्र​

Screenshot_2026-03-11-20-09-29-37_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा ( बुलढाणा माझा वृत्तसेवा ):जिल्ह्यात विविध कारणांमुळे महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत असतानाच, बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने या प्रकरणांचा छडा लावण्यात मोठे यश संपादन केले आहे. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे, वर्ष २०२५ मध्ये नोंद झालेल्या एकूण प्रकरणांपैकी तब्बल ८७ टक्के महिलांचा यशस्वी शोध घेऊन त्यांना कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.​महिला बेपत्ता होण्याच्या घटनांचा गांभीर्याने विचार करून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात स्वतंत्र ‘महिला मिसिंग डेस्क’ स्थापन करण्यात आले आहे. तसेच, जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर ‘मिसिंग सेल’ कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दोन्ही यंत्रणांनी एकमेकांशी योग्य समन्वय ठेवून तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे शोधकार्याला गती दिली. या चोख नियोजनामुळेच २०२५ मधील ८७ टक्के प्रकरणांचा यशस्वी निकाल लागला आहे.​प्रलंबित प्रकरणांवर लक्ष केंद्रितकेवळ २०२५ मधीलच नव्हे, तर मागील काही वर्षांतील प्रलंबित प्रकरणांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस दलाच्या माहितीनुसार, सन २०२१ पासून आजपर्यंत महिला बेपत्ता होण्याची एकूण २८४ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. या महिलांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दल सर्वतोपरी प्रयत्न करत असून, तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.​कुटुंबियांना दिलासाजिल्हा पोलीस दलाच्या या सक्रियतेमुळे अनेक कुटुंबियांना दिलासा मिळत आहे. ‘महिला मिसिंग डेस्क’च्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि बेपत्ता प्रकरणांचा तातडीने छडा लावण्यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्य करत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

You may have missed

error: Content is protected !!