एलपीजी गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा – शेख समद

IMG-20260311-WA0013

लोणार (यासीन शेख) – शासनाने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानकपणे फार मोठी वाढ केलेली असून गॅस सिलेंडरच्या नोंदणीचा कालावधी सुध्दा वाढविला आहे. याचा विपरीत परिणाम राज्यातील प्रत्येक कुटुंबावर होणार आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या शासनाने मोठ्या प्रमाणात गॅस दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केला आहे. या विरूध्द महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशाने व बुलडाणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार दिनांक 12 मार्च 2026 सकाळी दहा वाजता लोणार तहसीलदार यांना लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने लोणार तहसील समोर आंदोलन करून लोणार तहसीलचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे याकरिता लोणार शहरातील जनतेने व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अश्रुजी फुके, शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!