दिव्यांग लाभार्थ्यांनी यू.डी.आय.डी कार्ड संजय गांधी विभागास सादर करावे तहसीलदार दिवटे
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) तहसील कार्यालय सिंदखेडराजा अंतर्गत संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेले व घेणार आहेत अश्या दिव्यांग लाभार्थ्यांनी यू.डी.आय.डी .कार्ड ( UDRD KARD )संजय गांधी विभाग तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे सादर करणे अनिवार्य आहे. तसेच डी.बी.टी. पोर्टला (DBT PORTAL) संलग्न करणे अनिवार्य आहे तरी सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी संजय गांधी विभाग सिंदखेडराजा येथे संपर्क साधावा व महसूल सहाय्यक के.डी .इंगोले यांच्या कडे 15 मार्च पर्यंत जमा करावे अन्यथा आपले लाभ वितरण खंडित करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी यांची राहील असे आव्हान सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे ,यांच्या सह नायब तहसीलदार प्रांजल पवार ( संगायो) यांनी दिव्यांग बांधवांना केले आहे .या अहवानामुळे संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना यू.डी.आय.डी .कार्ड मिळविण्यास मदत होणार आहे.
