अंत्रीखेडेकर/मनुबाई चोरट्याचा सुळसुळाट शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा अंढेरा ठाणेदारांचे आव्हान. शेतातून 9 क्विंटल डॉलर हरभरा चोरी; शेतातील मोटार केबल चोरी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा!मनुबाई शिवारातील घटना; 72 हजारांचा मुद्देमाल लंपास
चिखली( एकनाथ माळेकर)तालुक्यातील अंढेरा पोलीस ठाणे हद्दीत शेतातून डॉलर हरभऱ्याचे कट्टे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी शेतात ठेवलेले डॉलर हरभऱ्याचे 18 कट्टे चोरी करून नेल्याने सुमारे 72 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिल केशव मापारी (वय 52, रा. मेरा बु., ता. चिखली, जि. बुलढाणा) हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीची जमीन मनुबाई शिवारातील गट क्रमांक 371 मध्ये असून त्यांनी यावर्षी त्या शेतात गहू, हरभरा व इतर पिकांची लागवड केली होती.
दि. 11 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास मळणी यंत्राच्या साहाय्याने शेतातील डॉलर हरभऱ्याची मळणी करण्यात आली. मळणीनंतर हरभरा 21 कट्ट्यांमध्ये भरून शेतातच ठेवण्यात आला होता. त्यानंतर रात्री सुमारे 11 वाजता मापारी हे घरी परतले.
मात्र 12 मार्च रोजी सकाळी सुमारे 6 वाजता गुरांना चारापाणी करण्यासाठी ते शेतात गेले असता हरभऱ्याच्या खळ्यावर ठेवलेल्या कट्ट्यांपैकी फक्त 3 कट्टे शिल्लक दिसले, तर उर्वरित कट्टे तेथून गायब असल्याचे आढळले. अज्ञात चोरट्यांनी रात्री 11 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान 18 कट्टे डॉलर हरभरा चोरी करून नेल्याचे स्पष्ट झाले.
चोरी गेलेल्या हरभऱ्याचे वजन अंदाजे 9 क्विंटल असून त्याची किंमत सुमारे 72 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांकडे विचारपूस केली असता कोणालाही याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.तर अंत्रीखेडेकर येथील एकनाथ माळेकर गट नंबर 53मधील शेतातील विहिरीवरील दोनशे फुटाची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे त्याची किंमत 3000रु आहे आशी तक्रार एकनाथ माळेकर यांनी अंढेरा पोलीस स्टेशन येथे दिली आहे
तक्रारदार अनिल मापारी यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच अंत्रीखेडेकर येथील केबल चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय आहे
या घटनेचा पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भारत जगन्नाथ पोफळे करीत आहेत.
