संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID प्रमाणपत्र तहसिल कार्यालयात सादर करण्याबाबत
चिखली (एकनाथ माळेकर) शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अनुदान वितरीत करण्यांत येत आहे, अशा लाभार्थ्यांचा दिव्यांग प्रमाणपत्राचा क्रमांक (UDID No) त्यांच्या आधार सोबत तसेच DBT पोर्टलवर संलग्न करणे अनिवार्य केलेले आहे त्याअनुषंगाने चिखली तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना सुचित करण्यांत येते की, त्यांनी त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची (UDID) छायांकीत प्रत व आधारची छायांकीत प्रत तात्काळ दि.15 मार्च 2026 पावेतो तहसिल कार्यालय चिखली येथे जमा करावी. याकामी दिनांक 14 व 15 मार्च 2026 रोजी सुटीच्या दिवशी सुध्दा तहसिल कार्यालयातील संगायो शाखा सुरु राहणार आहे. याबाबत काही शंका असल्यास गावातील संबंधीत ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे श्री.विजय सवडे, तहसिल चिखली यांच्यांकडून सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आवाहन करण्यांत येत आहे.
