राहीरीतील रेती उत्खननाचा पेच सुटला नाही: प्रशासनाच्या अटींवर साखळी उपोषण मागे

IMG-20260318-WA0013

सिंदखेडराजा( अनिल दराडे) राहीरी येथील खडकपूर्णा नदीपात्रातील रेती उत्खनना विरोधात तळेगाव फाटा येथे २६ फेब्रुवारीपासून सुरू असलेले साखळी उपोषण अखेर तहसीलदार अजित दिवटे यांच्या हस्ते सोडविण्यात आले. प्रशासन व ग्रामस्थांमध्ये झालेल्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या अटी निश्चित करण्यात आल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.या वेळी ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख, किनगाव राजा ठाणेदार संजय मातोंडकर यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड संजय सानप, ज्ञानेश्वर मुंढे उपस्थित होते. तसेच उपोषणकर्ते दत्तात्रय देशमुख, सरपंच पती बालाजी देशमुख, तालुका अध्यक्ष आनंद देशमुख आणि गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चर्चेदरम्यान रेती उत्खनन व वाहतुकीबाबत स्पष्ट नियम ठरविण्यात आले. त्यानुसार नदीपात्रातून रेतीची वाहतूक सफाळी दि. ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विनानंबर असलेल्या वाहनांना सक्त मनाई करण्यात आली असून, रेती घाटावर बोट, जेसीबी व पोकलेन यंत्राच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.याशिवाय, रेती घाटाच्या देखरेखीसाठी गावातील दोन सदस्‍यांची समिती स्थापन करण्यात येणार असून महसूल विभागाचे विशेष पथकही तैनात राहणार आहे. त्यामुळे अवैध उत्खननावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मार्ग काढण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मात्र, ठरविण्यात आलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही नागरिकांनी गावोगावी केली.*राहीरीतील रेती उत्खननाचा पेच सुटला नाही: प्रशासनाच्या अटींवर साखळी उपोषण मागे*राहीरी येथील खडकपूर्णा नदीपात्रातील रेती उत्खननाविरोधात तळेगाव फाटा येथे २६ फेब्रुवारीपासून सुरू असलेले साखळी उपोषण अखेर तहसीलदार अजित दिवटे यांच्या हस्ते सोडविण्यात आले. प्रशासन व ग्रामस्थांमध्ये झालेल्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या अटी निश्चित करण्यात आल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.या वेळी ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख, किनगाव राजा ठाणेदार संजय मातोंडकर यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड संजय सानप, ज्ञानेश्वर मुंढे उपस्थित होते. तसेच उपोषणकर्ते दत्तात्रय देशमुख, सरपंच पती बालाजी देशमुख, तालुका अध्यक्ष आनंद देशमुख आणि गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चर्चेदरम्यान रेती उत्खनन व वाहतुकीबाबत स्पष्ट नियम ठरविण्यात आले. त्यानुसार नदीपात्रातून रेतीची वाहतूक सफाळी दि. ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विनानंबर असलेल्या वाहनांना सक्त मनाई करण्यात आली असून, रेती घाटावर बोट, जेसीबी व पोकलेन यंत्राच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.याशिवाय, रेती घाटाच्या देखरेखीसाठी गावातील दोन सदस्‍यांची समिती स्थापन करण्यात येणार असून महसूल विभागाचे विशेष पथकही तैनात राहणार आहे. त्यामुळे अवैध उत्खननावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मार्ग काढण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मात्र, ठरविण्यात आलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही नागरिकांनी केली

You may have missed

error: Content is protected !!