टिटवी येथील तांडा वस्तीतील सिमेंट रस्ते उद्घाटनगावाचा विकासात भगवानराव यांचा मोठे योगदान – संभाजीराव सरकुंडे

IMG-20260318-WA0006

लोणार( यासीन शेख): लोणार तालुक्यातील ग्राम टिटवी येथील तांडा वस्तीतील सिमेंट रस्ते मंजूर टिटवी येथे तांडा वस्ती योजनेमधून ५ लाख रुपयाची सिमेंट रस्ते मंजूर करण्यात आले त्यांचे उद्घाटन संभाजीराव सरकुंडे आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक महाराष्ट्र व माजी आयुक्त माहिती अधिकार पुणे व अमरावती तथा माजी सी ओ जिल्हा परिषद बुलढाणा यांचे हस्ते करण्यात आले. त्यांचे सोबत राम धोके एनपीसी, अशोक जाधव हे होते. तसेच भगवान कोकाटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार उपसरपंच टिटवी केशव फुपटे, निवृती धोत्रे ,बबन तनपुरे ,संतोष डवरे, एकनाथ घाटे ,भगवान जाधव ,सखाराम राठोड ,मदन राठोड, दिलीप राठोड ,बबन कुटे सोनाजी राऊत ,हे उपस्थित होते. यावेळी सरपंच भगवानराव कोकाटे यांनी सर्वांगीण गावचा व समाजाचा विकास केला आहे. त्यामुळे हे गाव अती मागास असलेला होता.आज सर्व विकास पाहावं यास दिसत आहे हे श्रेय भगवानराव यांच्या मुळे झाल्याचे उद्गागार या प्रसंगी सरकुंडे साहेबांनी काढले.अजूनही कृषी क्षेत्रात काम केले जाईल त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र मध्य विदर्भात केज कल्चर पिंजरा पद्धतीने मत्स्य व्यवसाय सुरु करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले असे उत्तम उदाहरण दिले व भगवानराव कोकाटे यांचे कौतुक केले.

You may have missed

error: Content is protected !!