घरगुती गॅसचा व्यावसायिकांनी वापर केल्यास होणार कारवाई – तहसीलदार भूषण पाटील

New-Project-2026-03-12T095920.559

लोणार( यासीन शेख)सध्या आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि काळाबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी प्रशासन आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
लोणार तहसीलदार यांनी प्रसिष्ठी पत्राकाव्दारे लोणार शहर व तालुक्यातील सर्व गॅस एजन्सी धारक तथा पेट्रोल पंप धारक तसेच सर्व हॉटेल, उपहारगृह, ढाबा मालक, व्यावसायिक व मंगल कार्यालय मालक यांना निर्देशित केले आहे.
की सध्या जागतिक पातळीवर आखाती देशामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे भविष्यात अत्यावश्यक वस्तुचा तुटवडा निर्माण होऊ शकतो व साठेबाजी होऊन काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तु कायदा 1955, (कलम 3) तसेच (Maintenance of Production Storage and Supply) Order नुसार दिनांक 09 मार्च 2026 च्या पत्रकानुसार कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. तरी उपरोक्त व्यावसायिक यांनी घरगुती गॅसचा वापर करू नये, तसे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा कडून जिल्हा व तालुकास्तरीय दक्षता पथक स्थापन करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार तहसिलदार लोणार यांचे अध्यक्षतेखाली पथक स्थापन करण्यात आले असून त्यामार्फत गॅस एन्जसी, पेट्रोल पंपाची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान कुठल्याही प्रकारची अनियमितता,अफरातफर आढळल्यास जीवनावश्यक वस्तु कायदा अधिनियम 1955 नुसार कडक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी कोणत्याही ग्राहकाची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
लोणार तालुक्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की पेट्रोल, डिझल व गॅसचा साठा उपलब्ध आहे तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार व निरिक्षण अधिकारी (पुरवठा विभाग) लोणार यांनी केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!