विनोबा कार्यक्रमांतर्गत उपक्रमशील शिक्षक विलास पऱ्हाड यांचा जिल्हास्तरावर गौरव…
बुलढाणा: जिल्हा परिषद बुलढाणा आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (OLF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभात ७४ आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राखणाऱ्या आणि विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल या कार्यक्रमाद्वारे घेण्यात आली.या गौरव सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात, प्रकल्प अधिकारी श्री पी. एस. कोल्हे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात यांनी यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तेचा आलेख असाच उंचावत ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी श्री अकील शेख व श्री अनिल देवकर, प्रकल्प अधिकारी श्री. पी. एस. कोल्हे, विस्तार अधिकारी सौ. जयमाला राठोड आणि श्री अतुल देशपांडे, श्री. मोहन सुरडकर आणि श्री. शेख नजीर यांचीही उपस्थिती होती. सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ‘पोस्ट ऑफ द मंथ’ (POM) स्पर्धेत विलास पऱ्हाड pm shri शाळा कव्हाळा पंचायत समिती चिखली यांचा यावेळी जिल्हास्तरावर सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या जीवन कौशल्य उपक्रमांतर्गत महावाचन, कथा वाचन, कविता वाचन, स्पोकन इंग्लिश, स्पेलिंग बी आणि मॉर्निंग असेंब्ली यांसारख्या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचाही विशेष सन्मान झाला.विलास पऱ्हाड यांनी एनएमएमएस (NMMS) आणि शिष्यवृत्ती सराव परीक्षेत आपला सहभाग घेतला आहे
