चिखलीत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या निर्धाराने गुढीपाडवा उत्साहात संपन्न; महाराणा प्रताप स्मारकावर गुंजला हिंदुत्वाचा हुंकार!

motion_photo_3096613874392649508

चिखली ( बुलढाणा माझा न्युज):चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चिखली शहरात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा महोत्सव अत्यंत उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक येथे सर्व हिंदु बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक गुढी उभारून हिंदु नववर्षाचे भव्य स्वागत केले.गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्वगुढीपाडवा हा हिंदु धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. हा दिवस म्हणजे विजय अन् चैतन्य मिळवण्याचा दिवस आहे. संस्कृती संवर्धन व जतन करण्याच्या हेतूने चिखलीमध्ये सामूहिक गुढी उभारण्याचा उपक्रम राबवण्यात आला. शास्त्रशुद्ध गुढी उभारल्याने ईश्वरी तत्त्व आणि सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता वाढते, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.*हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा*याप्रसंगी गुढी म्हणजे ब्रह्मध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद येवले यांनी गुढीपाडव्याचे ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व विशद केले. “भारतीय हिंदु संस्कृतीचे जतन व्हावे आणि हिंदु समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे, या हेतूने ही सामूहिक गुढी उभारण्यात आली आहे. पुढे सर्वांनी मिळून राष्ट्र व धर्म कार्यासाठी संघटित व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी ‘हिंदु राष्ट्र अर्थात रामराज्य’ स्थापनेची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.मान्यवरांची उपस्थिती आणि उत्साहया महोत्सवात शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गणेश चव्हाण, शिवसेनेचे राकेश चोपडा, गोरक्षक ओमराजे गायकवाड, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे राहुल मोरे, इस्कॉनचे स्वरूप भावसार, हरिभाऊ सोळंके यांचा समावेश होता. तसेच हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद येवले, सुजित कोरे, अनिकेत पेंढारकर, प्रताप कंडारे, संदीप ठेंग, चेतन गुप्ता, विशाल इंगळे, ऋषी करवंदे, दीपक गाडेकर आणि विजय लाहोरकर, सुधाकर इंगळे यांनी नियोजनासाठी पुढाकार घेतला.महिला शक्तीचा लक्षणीय सहभागकार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महिला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग. यामध्ये शितलताई इंगळे, वैष्णवीताई मोरे, किरणताई सोळंकी, सविताताई चव्हाण, दिपालीताई बांबल, ज्योतीताई मोरे, सृष्टीताई कंडारे यांच्यासह अनेक महिलांनी उपस्थित राहून नववर्षाचे स्वागत केले आणि धर्मकार्यात सक्रिय राहण्याचा संकल्प केला.चिखलीतील या उपक्रमामुळे परिसरात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, हिंदु समाजात ऐक्य आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे.

You may have missed

error: Content is protected !!