किनगाव राजा येथे रमजान ईद उत्साहात साजरी

IMG-20260321-WA0024

सिंदखेडराजा(अनिल दराडे) किनगाव राजा येथे रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि आनंदात साजरी करण्यात आली. मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र असलेला हा सण आज दिनांक 21 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.काल सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर किनगाव राजा येथील जामा मस्जिदचे मोलवी मियाभाई यांनी माईकवरून ईद आज सकाळी ९ वाजता साजरी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. काही जण पायदळ तर काही जण वाहनांद्वारे ईदगाहवर दाखल झाले.यावेळी मौलाना मियाभाई यांच्या हस्ते ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. रमजान महिन्यातील उपवासानंतर आलेल्या या आनंदोत्सवात बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा यांचे सुंदर दर्शन घडले.नमाज पठणानंतर PSI मोहन गीते, आनिल नागरे (बीट जमदार) आणि विश्वास काकड यांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मुक्तार शेख, अकिल कुरेशी फिरोज शेख, लतिफ कुरेशी, इसाक कुरेशी, आफ्रोज शेख, अफ्रोज पठाण, राजू कुरेशी,सलीम पठाण, इरफान पठाण,फारुख कुरेशी, असिफ कुरेशी, अशपाक कुरैशी,अल्ताफ कुरेशी, आसेफ पठाण, वसीम कुरेशी, लूकमान शेख, मोहसिम शेख, सद्दाम शेख, कदीम शेख, रहेमान शेख, सल्लुद्दीन शेख, मोजीम शेख, नाजिम शेख, उमेद पठाण, हकीम पठाण, शेख आक्रम यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नमाजानंतर गावभर एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा देण्याचा आनंदोत्सव रंगला. लहान मुलांनी शीरखुर्याचा आस्वाद घेत ईदचा आनंद अधिकच द्विगुणित केला.

You may have missed

error: Content is protected !!