धनुर्विद्येत सुंदरखेडच्या विदीशा डोंगरदिवेचा ‘सुवर्ण’ वेध!​महाराष्ट्र राज्य स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक गटात पटकावले प्रथम स्थान; दोन सुवर्णपदकांसह गावाचे नाव केले उज्वल​…

IMG-20260321-WA0028

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):तालुक्यातील सुंदरखेड येथील माऊली पार्क परिसरातील कु. विदीशा डोंगरदिवे हिने राज्यस्तरीय धनुर्विद्या (Archery) स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी बजावली आहे. विदीशाने या स्पर्धेत महाराष्ट्रात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून दोन सुवर्णपदके (Gold Medals) आपल्या नावावर केली आहेत. तिच्या या यशामुळे सुंदरखेडसह संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.​विदीशाने अत्यंत कठीण परिश्रमातून आणि जिद्दीच्या जोरावर धनुर्विद्या या खेळात प्राविण्य मिळवले आहे. राज्य स्तरावर एकाच वेळी दोन सुवर्णपदके जिंकून तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. ग्रामीण भागातील मुलीने क्रीडा क्षेत्रात गाजवलेल्या या पराक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.​पालकांचा गौरव व विदीशाला रोख बक्षीसविदीशाच्या या ऐतिहासिक यशाची दखल घेऊन तिचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सुंदरखेड येथील सेवानिवृत्त कर्मचारी यांनी विदीशाच्या आई-वडिलांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, विदीशाच्या पुढील क्रीडा प्रवासाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने तिला रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. “मुलीच्या यशामध्ये पालकांचा मोठा वाटा असतो, त्यांच्या पाठबळामुळेच विदीशाने हे यश संपादन केले आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.​विदीशा डोंगरदिवे हिच्या या यशाबद्दल सुंदरखेड परिसरात आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात ती राष्ट्रीय स्तरावर देखील अशाच प्रकारे चमकून जिल्ह्याचे नाव रोशन करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

You may have missed

error: Content is protected !!