श्री व्यंकटेश महाविद्यालयात गुणवंत सत्कार समारंभ संपन्न

IMG-20260322-WA0017

सिंदखेडराजा (अनिल दराडे )स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२५ परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. राजेंद्र भोसले आणि मंगेश ढोबळे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते.प्रा. राजेंद्र भोसले यांनी मार्गदर्शन करताना आपण परिस्थितीची जाणीव ठेवून जगत राहिलो तर कधीच आपल्यात अहंकार निर्माण होत नाही, असे मत व्यक्त केले. आई, वडील आणि गुरू यांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही, एवढे योगदान त्यांनी आपल्याला घडविण्यासाठी दिलेले असते, अशी माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी प्रा. पी.डी. मिनासे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी महाविद्यालयाची गुणवत्ता कायम राखल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठ परीक्षेतील यशप्राप्त विद्यार्थी, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभागी असलेले विद्यार्थी तसेच पुस्तक लेखन करणारे, पेटंट प्राप्त, पुरस्कार प्राप्त प्राध्यापक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. मंजुषा मुळे यांनी केले. प्रास्ताविक समिती समन्वयक प्रा. बाळासाहेब काळे यांनी व अतिथी परिचय डॉ. एकनाथ भालेराव यांनी करून दिला. प्रमाणपत्र वाचन प्रा. सोपान चव्हाण यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. मंदार जोशी यांनी मानले. कार्यक्रमास पारितोषिक दाते प्रायोजक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!