जितेंद्र आव्हाडांची आमदारकी रद्द करा; चिखलीत व मलकापूर सकल हिंदू समाजाचे तहसीलदारांना निवेदन सादर…

IMG-20260322-WA0018

चिखली(बुलढाणा )( बुलढाणा माझा न्युज ): छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम आणि हिंदू संस्कृतीबद्दल सातत्याने अपमानजनक विधाने करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी त्वरित रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आज चिखली येथे सकल हिंदू समाज आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. चिखलीचे नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच मलकापूर चे नायब तहसीलदार श्री चौधरी यांनी हे निवेदन स्वीकारले.​इतिहासाचा विपर्यास खपवून घेणार नाहीनिवेदनात नमूद केल्यानुसार, आमदार जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक इतिहासाचा विपर्यास करत असून, राज्याभिषेकासारख्या पवित्र प्रसंगाबाबत जातीय विष पसरवणारी विधाने करत आहेत. लोकशाहीचा गैरवापर करून विधीमंडळाच्या पदाची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशा लोकप्रतिनिधीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. केवळ ‘दिलगिरी’ व्यक्त करून वेळ मारून नेणाऱ्या प्रवृत्तीला आता कायमचा लगाम घालण्याची वेळ आली आहे, असा पवित्रा हिंदू संघटनांनी घेतला आहे.*​’ईशनिंदा विरोधी कायदा’ करण्याची आग्रही मागणी*धर्म, देवता, संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांची विटंबना करणाऱ्यांविरोधात राज्यात तातडीने ‘ईशनिंदा विरोधी कायदा’ संमत करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. वारंवार होणाऱ्या या अपमानास्पद प्रकारांमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात असून, सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.​प्रशासनाकडून दखलनायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच मलकापूर नायब तहसीलदार श्री चौधरी यांनी निवेदन स्वीकारले असून, यातील मागण्या आणि भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.*​उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते*:निवेदन सादर करतेवेळी हिंदु जनजागृती समितीचे , प्रसाद येवले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे गणेश चव्हाण, गोरक्षक ओमराजे गायकवाड, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे राहुल मोरे, सुजित कोरे, अनिकेत पेंढारकर, हरिभाऊ सोळंके, आकाश सांगळे, चेतन गुप्ता, संदीप ठेंग, योगेश भगत, विजय लाहोरकर, दीपक गाडेकर, तुषार भुतेकर, विशाल भुतेकर, प्रताप कंडारे, ऋषीकेश करवंदे, राकेश गोंधणे, सुनील जाधव तसेच मलकापूर चे डॉ. ज्ञानेश देशपांडे सौ भारती दहिभाते यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.​

You may have missed

error: Content is protected !!