चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा महास्फोट….!शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश…..!आमदार संजय गायकवाड यांचा मास्टरस्ट्रोक…..!

IMG-20260322-WA0020

निलेश कोल्हे

चिखली:- विधानसभा मतदारसंघातील भाजपा, उबाठा, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी तसेच विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश शिवसेना मातोश्री जलसंपर्क कार्यालय बुलढाणा येथे पार पडला.चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला जबरदस्त कलाटणी देणारी ऐतिहासिक घडामोड दि.२२/०३/२०२६ रोजी बुलढाण्यात पाहायला मिळाली. शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप, उबाठा गट, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी तसेच विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी, सरपंच, शाखाप्रमुख, बूथप्रमुख,उपशाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.या भव्य प्रवेशामुळे चिखली मतदारसंघातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले असून शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.उदयनगर, भोगावती, अटकळ, शिंदेहराळी, पांगरखेड, सोयगाव, शेलुद, ढालसावंगी, दहिद खुर्द, केळवद, देवपूर, करणखेड, भानखेड, तेल्हारा, पेठ, बोरगाव काकडे, आंधई, गोदरी, डोंगरशेवली आदी गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी एकाच मंचावरून शिवसेनेत प्रवेश करत शक्तिप्रदर्शन केले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बूथ प्रमुख, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.संजुभाऊ गायकवाड यांचे नेतृत्व ठरले निर्णायकया भव्य पक्षप्रवेशामागे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी कोणताही दबाव नसताना स्वेच्छेने शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. “शिवसेना ही सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. पक्षप्रवेश हा जनतेच्या वाढत्या विश्वासाचा पुरावा आहे,” असे संजुभाऊ गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.

विरोधकांना मोठा धक्का; समीकरणे बदलणार

भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. गावपातळीपासून मतदारसंघापर्यंत नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. मोठ्या संख्येने उपस्थिती : या सोहळ्यास शिवसेना जिल्हा व तालुका पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी दणाणून गेला होता.

You may have missed

error: Content is protected !!