बिबीत रंगला कुस्त्यांचा चित्तथरारक फड…

Screenshot_2026-03-23-10-12-32-61_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बिबी प्रतिनिधी :- जयजीत आडे

बीबी :- येथे गुढीपाडवा चैत्र उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे कुस्त्यांची दंगल याही वर्षी गाजली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मल्लांनी दिवसभर आपल्यातली कुस्तीच्या पैलूची चुणूक दाखवीत कुस्तीप्रेमींच्या अंगावर शहर आणले. बिबी च्या आखाड्याचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे मानाची शेवटची कुस्ती खेळण्यासाठी दिल्ली येथून उदयकुमार आणि अंबड रोहीला गड येथून युवराज जाधव यांनी अंतिम विजेता ठरवण्यासाठी लाल मातीत रंगलेल्या चित्तरक व काळजाचे ठोके वाढवणारा शेवटच्या कुस्तीला शोभेल असा डावपेच पाहायला मिळाले. भरपूर वेळ चाललेली कुस्तीतील दोन्ही मल्ल घामाघुन झाले होते ११हाजार रुपयाची अंतिम कुस्तीची झुंज पंच कमिटीने काल निर्णय सोडत दोघांनाही बक्षीस समसमान दिले . गुढीपाडवा मराठी चैत्र नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावच्या परंपरा जपत पाडव्याच्या दिवशी रात्री वाघ्या मुरळी,आणी सोंगाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली रात्रभर जागरण गोधळ ‘ झाडझूडीचे सोंग, लिंबड्याचे सोंग,. गणपातीबाप्पा, सारजा, हे सर्व मोठ्या उत्कृष्ट पद्धतीने साकार करताना पाहावयास मिळाले सकाळी या सर्व देवींना दरवर्षीप्रमाणे वाजत गाजत गावातून नगर प्रदक्षिणा घेत गावातील गढी जवळ गढीचे मालक शिवाई देवी यांचे १८वे वंशज विठ्ठल पाटील आटोळे यांनी मानाची आरती घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी बिबी गावासह पंचक्रोशीतील महिला वर्ग सह पुरुष मंडळी मोठ्या संख्येने हजर असून काहींनी नवस फेडले तर काहींनी आपल्या सुखी संसारासाठी देवींना सुख समृधीसाठी मनोभावे साकडे घातले यानंतर दुपारी एक वाजता दरवर्षीच्या रितीरिवाजाप्रमाणे कुस्त्यांना सुरुवात झाली. गुढीपाडवा मराठी चैत्र नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गावाच्या परंपरा सुरू ठेवून कुस्त्यांची दंगल रंगली आजचा युवक हा दारू बिडी, तंबाखू,गुटखा यासारख्या महाभयंकर व्यसनापासून मुक्त झाला पाहिजे या उद्देशाने गावकऱ्यांनी बिबी येथील चंद्रकला हाईट्सचे प्रागंनात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा सह जालना संभाजीनगर वाशिम,बिड, नांदेड,बुलढाणा,दिल्ली सारख्या ठिकानाहून कुस्तीपटूंनी हजेरी लावली होती.या कुस्त्यांच्या दंगलीत दीड लाख रुपयांचे बक्षिस .ठेवण्यात आले होते या कुस्त्यांच्या आखाड्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करून पहिली कुस्ती १०० रु आणी नारळ देऊन सुरुवात करण्यात आली परिसरातून १० वर्षे वयापासून आलेल्या पहिलवानांनी सुद्धा कुस्त्या खेळून प्रेक्षकांची मने जिंकली त्यानंतर मोठ्या पहिलवानांच्या कुस्त्यांना सुरुवात झाली यानंतर बऱ्याच पहिलवानांनी आपली कर्तबदारी यामध्ये दाखवली शेवटी मानाची कुस्ती संध्याकाळी साडेपाच वाजता सुरुवात झाली बराच वेळ अथक परिश्रम घेऊन दोन्हीही मल्लांना यश अपयश आले नाही यावेळी पंचांनी अंतीम निर्णय घेऊन दोघांना समान बक्षीस देऊन सन्मान करून सांगता झाली यावेळी बिबी गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच,सदस्य.सह पोलीस स्टेशनचे ठानेदार सह कर्मचारी हजर होते

You may have missed

error: Content is protected !!