पाडळी शिंदे ते वाकद शेतरस्त्याचा रस्ते विकास आराखड्यात समावेश करण्यास टाळाटाळ जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष
गाव जोड व रस्ते विकास आराखडा यात समावेश न केल्यास सर्व सार्वत्रिक निवडणूक यावर बहिष्कार टाकण्याचा पाडळी शिंदे वाशीयांचा निर्णय व मागितली सामूहिक आत्मदाहनास परवानगी
देऊळगाव राजा.( एकनाथ माळेकर )देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे ते वाकद या शेतरस्त्याचा रस्ते विकास आराखडा यात समावेश करण्यास टाळाटाळ केल्याच्या विरोधात पाडळी शिंदे येथील ग्रामस्थ व शेतकरी वर्ग यांनी तहसीलदार देऊळगाव राजा यांना २४मार्च रोजी लेखी निवेदन देण्यात येऊन पाडळी शिंदे ते वाकद या शेतरस्त्याचा रस्ते विकास आराखडा यात समावेश करण्यास टाळाटाळ झाल्यामुळे शेतकरी वर्ग आक्रमक पवित्रा घेत रस्ता रस्ते विकास आराखडा यात समावेश न झाल्यास येणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणूक यावर बहिष्कार टाकण्याचे व सामुहिक आत्मदाहनास परवानगी सुद्दा मागण्यात आली असून निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पाडळी शिंदे ते वाकद या शेतरस्याचा रस्ते विकास आराखडा व गाव जोड रस्ता यात समावेश करण्यास कागदपत्रे यांची पूर्तता करून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा व जिल्हा परिषद बांधकाम विभाग बुलढाणा यांच्या कडून सहा महिन्यांपूर्वी कागदपत्रे सादर करून अक्षम्य दुर्लक्ष केली असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यात म्हटले आहे की पाडळी शिंदे ते वाकद शेतरस्ता यासाठी ग्रामपंचायत पाडळी शिंदे व गट ग्रामपंचायत केशव शिवणी यांनी सर्व कागदपत्रे व तहसीलदार सिंदखेडराजा व देऊळगाव राजा यांनी जागा उपलब्ध व भूसंपादन करण्याची गरज नसल्याचे प्रमाणपत्र व सदर रस्त्यावरील शेतकरी वर्ग यांचे दानपत्रक नकाशानुसार शेतकरी वर्ग यांनी पूर्तता केली असून सातबारे उतारे आधार कार्ड व इतरही कागदपत्रे व वनविभाग बुलढाणा यांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर सुद्दा करण्यात आले असतांना जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग बुलढाणा यांनी सहा महिने कागदपत्रे सादर केल्यानंतर अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे पाडळी कर आक्रमक भूमिका घेतली व तहसीलदार देऊळगाव राजा यांना लेखी निवेदन देण्यात येऊन पाडळी शिंदे ते वाकद या शेतरस्त्यांचा रस्ते विकास आराखडा यात समावेश न झाल्यास व गाव जोड मध्ये रस्ते विकास आराखडा यात समावेश तात्काळ न केल्यास व मजबूती करण करून न दिल्यास येणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणूक यावर बहिष्कार व सामुहिक आत्मदाहनास परवानगी सुद्दा मागण्यात आली असून निवेदनावर दोनशे छप्पन महिला पुरुष यांच्या सह्या होत्या व निवेदन देते वेळी शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते
