ऐशियन लेक्रॉस स्पर्धेत विजेत्या भारतीय संघाचा केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले सत्कार …

IMG-20260326-WA0003

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज )ऐशियन लेक्रॉस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवुन देणाऱ्या भारतीय संघाचा आज केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी सत्कार केले . साऊदी अरब येथील रियाद येथे 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान ऐशियन लेक्रॉस स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भारतीय संघ सहभागी झाला होता. त्यांच्या संघाने इराक विरुध्द झालेल्या शेवटच्या सामन्यामध्ये 9-2 फरकाने विजय मिळवत भारताला ऐशियन लेक्रॉस स्पर्धेत अजिंक्य पद मिळाले. या संघामध्ये देशभरातुन 18 खेळाडु सहभागी झाले होते. विजेत्या संघाला केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्ली येथील निवासस्थानी बोलून खेळाडूंशी संवाद साधला भारत देशाचे नाम रोषण करणाऱ्या या खेळाडूंचा सत्कार केला . भारत देश सर्वचस्तरावर नावलौकिक मिळवीत आहे . खेळ क्षेत्रामध्ये आपण केलेली कामगिरी ही भारतीयांसाठी बहुमोलाची आहे .असे सांगून सर्व खेळाडूंच कौतुक केलं

You may have missed

error: Content is protected !!