राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला रजत पदक……!!

IMG-20260325-WA0052

प्रतिनिधी निलेश कोल्हे

चिखली:- तालुक्यातील धोडप येथील रहिवासी पुंजाजी नामदेव कोल्हे नगरपरिषद विद्यालय शेगाव येथे कार्यरत क्रीडा शिक्षक यांनी या ५ राष्ट्रीय खेलो मास्टर्स कबड्डी स्पर्धा चंदिगड येथे सहभाग घेतला होता व महाराष्ट्रातील अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये त्यांच्यासोबत सहभागी होते.राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला रजत पदक मिळाले. या स्पर्धेमध्ये५ वी राष्ट्रीय खेलो मास्टर्स कबड्डी स्पर्धा चंदिगड येथे दिनांक २० ते २४ मार्च दरम्यान पार पडली यामध्ये महाराष्ट्रासह देशातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये कबड्डीच्या सामन्यांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने हिमाचल प्रदेश संघाचा संघाविरुद्ध खेळत असताना अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये थोड्या फरकाने महाराष्ट्राला या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आणि महाराष्ट्र संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. यामध्ये महाराष्ट्राच्या संघामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड,अकोला, यवतमाळ, आणि बुलढाणा,या जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होते महाराष्ट्र संघात खालील खेळाडू होते आनंद थळे कर्णधार अशोक सराटे,बादल राठोड,उपकर्णधार मनोज मात्रे, पुंजाजी कोल्हे,जगदीश डबरे, खराडे ,संदीप राठोड, वसंत गिरे, आणि जैन या खेळाडूंचा सहभाग होता खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे यामध्ये प्रामुख्याने मुंबई पुणे रायगड ठाणे बुलढाणा यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यातील काही खेळाडूंचा सहभाग होता महाराष्ट्राच्या संघामध्ये. हिमाचल प्रदेश चे एस पी अजय ठाकूर हे हिमाचल प्रदेश संघाचे प्रशिक्षक होते आणि ते प्रो कबड्डी मध्ये खेळलेले होते. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील धोडप येथील क्रीडा शिक्षक पुंजाजी नामदेव कोल्हे नगर परिषद विद्यालय शेगाव येथे कार्यरत क्रीडा शिक्षक शेगाव हे सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होते.

You may have missed

error: Content is protected !!