ग्रामीण जनतेला दिलासा; बारलिंगा व कोयाळी येथे नव्या डाक शाखांची सुरुवात…
शहर प्रतिनिधी : रवि ढवळे
सिदखेडराजा:- ग्रामीण भागातील नागरिकांना विविध टपाल, विमा व वित्तीय सेवा सुलभ व्हाव्यात या उद्देशाने भारतीय डाक विभागाच्या वतीने नव्या शाखा डाकघरांचे उद्घाटन करण्यात आले. दुसरबीड उपडाकघर अंतर्गत बारलिंगा व लोणार उपडाकघर अंतर्गत कोयाळी शाखा डाकघर सुरू करण्यात आले. या शाखांचा शुभारंभ डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांच्या हस्ते झाला. डाक निरीक्षक गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. उद्घाटनावेळी केंद्रांची सजावट फुगे व रिबीनने करण्यात आली होती. या शाखांमधून बाल आधार, सुकन्या खाते, बचत खाते व DBT सेवा उपलब्ध होणार आहेत. यावेळी निरंजन शुक्ला, बद्रीनाथ पालवे, शंकर खरात, देवानंद अकाळ तसेच विष्णू काळुसे व समाधान मोरे उपस्थित होते. यासोबतच BPM व ABPM देखील उपस्थित होते. तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, गावकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार असल्याचे सांगण्यात आले.
