सिंदखेडराजा तालुक्यात घरकुल हप्ता वितरणात अव्वल, पंचायत समितीची दमदार कामगिरी
सिंदखेडराजा (अनिल दराडे) पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यात घरकुल हप्ता वितरणात उल्लेखनीय कामगिरी बजावण्यात आली आहे. पंचायत समितीच्या गतिमान कामकाजामुळे तालुक्यातील लाभार्थ्यांना वेळेत आणि विनाअडथळा लाभ मिळत आहे.
मार्च अखेरीस वितरित केलेले हप्ते- पहिला हप्ता: 11475 लाभार्थी- दुसरा हप्ता: 5128 लाभार्थी- तिसरा हप्ता: 2824 लाभार्थी- चौथा हप्ता: 154 लाभार्थीपंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित बांगर यांच्या नेतृत्वात घरकुल विभाग व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मेहनतीने ही कामगिरी बजावण्यात आली आहे.”येणाऱ्या काळातही गतिमान पद्धतीने कामकाज करून, तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना वेळेत आणि विनाअडथळा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असणार आहे” असे अजित बांगर, गटविकास अधिकारी म्हणाले.पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा उद्देश देशातील सर्व नागरिकांना 2022 पर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित आवास उपलब्ध करून देणे आहे.
