किनगाव राजा पोलीस ठाणे हद्दीतील दुसरबीड येथे झालेल्या किरकोळ वादातून मारहाणीची घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

23_01_2023-fight_23306704_19479552

सिंदखेडराजा( अनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरं बिड मधे शिल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली असं दोन्ही गटातील परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेपोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कायमी अप नंबर 116/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 194(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश वारकरी (वय 35, रा. किनगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात शेख इरफान अली शहारुम अली, जुनेद अली मुनावर अली, शेख साजेद शेख शब्बीर, शेख जाकेर शेख महेमुद, शेख नौशाद शेख शमशाद, शेख याकुब उर्फ नसेर बाबा मिया, शेख जिलानी शेख अब्बास, शेख इरफान शेख सालार (सर्व रा. दुसरबीड) तसेच इतर 20 ते 25 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दि. 22 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास दुसरबीड येथील शेख याकुब यांच्या घरासमोर घडली. शिरखुर्मा व ईदगाह नामनिर्देशनाच्या कारणावरून वाद निर्माण होऊन संबंधितांनी सार्वजनिक ठिकाणी झोंबा-झोंबी करत एकमेकांना मारहाण केली. या घटनेमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता भंग झाली.सदर प्रकरणी फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून दि. 28 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार विष्णु मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You may have missed

error: Content is protected !!