महाराष्ट्राच्या राजकारणातील, सहकारातील “राजहंस” व्यक्तीमत्व …म्हणजे मा.डाॅ राजेंद्र भास्कररावजी शिंगणे साहेब….
बुलढाणा (एकनाथ माळेकर)जिल्ह्याच्या सहकारी चळवळीला ज्यांनी एक नवा आयाम दिला बुलढाणा जिल्ह्यातील सहकार चळवळ गावं तांडा वस्तीवर नेली त्या सहकार चळवळीचा भरभक्कम पाया विदर्भाच्या सहकार चळवळीने घातला बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेंच्या भरभराट करून त्या बँकचे अनेक वर्षं अध्यक्ष पद भूषविलेले सहकारातलं महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन चे अध्यक्ष पद भूषविलेले सहकारातलं आभाळाएवढ मोठं नाव म्हणजे सहकार महर्षी भास्करावजी शिंगणे साहेब मोठ्या साहेबांचा सहकाराचा, राजकारणाचा ,समाजकारणाचा सत्यशोधकीय विचाराचा प्रगल्ब वारसा चालवणारे लोकनेते म्हणजे आमचे आधारवड माजी मंत्री डॉ राजेंद्र भास्करराव शिंगणे साहेब. सहकार महर्षी भास्करावजी शिंगणे साहेबांचा १९९१ला हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाल्यानंतर संपूर्ण बुलढाणा जिल्यावर एक हिमालया एवढं कधी ही नं भरून येणार दुःख संपूर्ण बुलढाणा जिल्यावर आलं होतं मोठ्या साहेबांच्या जाण्याने जनुकांची संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोरका झाला होता, त्यांच्या आशा आकस्मिक जाण्याने बुलढाणा जिल्ह्यातील सर्वांचं कार्यकर्ते सयरभयर झाले होते अशातचं सर्वंच कार्यकर्त्यांनच्या व जुन्या जाणत्या सर्वांचं कार्यकर्त्यांनच्या सहकाऱ्यांनच्या आग्रावास्तव बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेंचे अध्यक्ष पद या डॉ राजेंद्र भास्करराव शिंगणे साहेबांनी आवाहानात्मक परीस्थितीत स्वीकारले ते सहकाराचं घेतलेलं व्रत आवाहन आज पर्यंत अत्यंत सक्षमपणे सांभाळलं सहकारात काम करत असताना सहकारात का करत असताना राजकारणाची जोडे कायमचे बँकेबाहेर काढायचे हा जो मोठा साहेबांचा संस्कार साहेबांवर कायमचा झाला तो शेवटपर्यंत कायम राहिला आणि तो प्रामाणिकपणे जोपासला माननीय साहेबांना सहकारात अनेकांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला परंतु साहेबांनी सहकाराच्या माध्यमातून कधीच कोणाला अडचणीत आणलं नाही त्यामुळे आजही साहेब सहकारात व सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी सहकारी संस्था असलेल्या दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर चे गेले दहा वर्ष बिनविरोध अध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळत आहे या सहकारी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही संस्था यशस्वीरित्या माननीय साहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करत आहे माननीय साहेब या संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे गेल्या वर्षी या संस्थेचे भव्यदिव्य कार्यालय बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्यालय बुलढाणा येथे माननीय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या शुभहस्ते व माननीय कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर यांच्या शुभहस्ते व साहेबांच्या अध्यक्षतेखाली या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा वरील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला बुलढाणा जिल्ह्याच्या सहकाराच्या चळवळीतला हा एक मानाचा तुरा माननीय साहेबांचे नेतृत्वात रोवला गेला माननीय साहेबांचा सहकाराच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास अत्यंत चढत्या क्रमाने आणि सहकारातील महत्त्वाच्या पदावर काम करण्याचा असल्यामुळे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय लोकनेते सर्वांचे लाडके दादा माननीय अजित दादा पवार साहेब महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना माननीय साहेब सुद्धा राज्य शिखर बँकेचे तीस वर्ष संचालक म्हणून माननीय अजित दादा सोबत सहकारी चळवळीत साहेबांनी माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी काम केलं गेली 30-35 वर्ष अजित दादा सोबत काम केल्यानंतर त्यांचा प्रचंड सहवास माननीय साहेबांना गेल्या 30-35 वर्षात मिळाला त्यास उदार भावनेतून एक मैत्रीचं नातं जोपासत असताना माननीय साहेब म्हणजे एक संवेदनशील मनाचा माणूस एक हळव्या मनाचा माणूस अजित दादा गेले त्या काळ्या दिवशी मी सुद्धा माननीय साहेबांसोबत बारामतीला अजित दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी साहेबांसोबत उपस्थित होतो त्याच्या चेहऱ्यावरचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना त्यांच्या मनामध्ये चाललेलं एक वेगळे युद्ध त्यांच्या अजितदादाच्या आठवणी त्या प्रसंगाच्या त्या बारामतीतल्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही कारण साहेब इतके मनाचे त्याची आपण कल्पनाही हळवे आपन विचार ही करु शकत नाही प्रत्येक वेळेस मंत्रिमंडळात राज्य शिखर बँकेत दादांसोबत माननीय साहेबांनी काम केलेलं होतं. प्रत्येक वेळेस माननीय दादांची साहेबांच्या बाबतीत ओंजळ ही भरलेलीच असायची त्यामुळे दादांनी मला भरभरून दिलं ही भावना आजही साहेबांच्या मनात कायम आहे त्यामुळे माझ्या घरातील एक कर्ता व्यक्ती गेल्याचे दुःख साहेबांना झालेलं आहे या दुःखात महाराष्ट्र सुद्धा पोरका झालेला आहे आणि अशा परिस्थितीत माझा वाढदिवस साजरा करणे हे माझ्या मनाला अजिबात पटत नाही त्यामुळे माझा वाढदिवस साजरा न करता अजित दादांना आपण माझ्या वाढदिवशी श्रद्धांजली अर्पण करुया आणि त्यांना कायम स्मरणात ठेवूया असे भावनिक आव्हान माननीय साहेबांनी समस्त कार्यकर्त्यांना केलं. माननीय साहेबांचा 1991 ते 95 पासून सहकाराच्या माध्यमातून सुरू झालेला राजकारणाचा आजपर्यंतचा प्रवास अविरतपणे अखंडपणे चालत आहे मोठे साहेब गेल्यानंतर मात्र सिंदखेडराजा मतदार संघ हा पोरका झाला होता मोठ्या साहेबांची उणीव अनेक कार्यकर्त्यांना जाणवत होती त्यांच्या नेतृत्वाची पोकळी कधीही भरून निघणार नव्हती परंतु वेळेसोबत आपल्याला चालावं लागेल या उदार भावनेतून मोठ्या साहेबांनी या मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना जोडलेले कार्यकर्ते सर्वधर्मसमभावाची शिकवणूक माननीय साहेबांनी आचरणात आणली जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचं जाळ नवीन कार्यकर्त्यांचे सहकार्य यांची सांगड घालून अनेक परिघाबाहेरच्या बीन चेहऱ्यांना तरुणांना साहेबांनी चेहरा देण्याचे काम सातत्याने केलं प्रवाहा बाहेरच्या लोकांना सत्तेतले पद दिली त्यांना मुख्य प्रवाहात आणलं सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. 1995 ला महाराष्ट्र मध्ये युती शासन असताना साहेबांनी मातृतिर्थ सिंदखेड मतदार संघाचे सर्वसामावेशक नेतृत्व करत असताना आपल्यातील एक संयमी एक सक्षम एक दूरदृष्टी विकास भुमुक नेतृत्वाची झलक संपूर्ण बुलढाणा जिल्हाला दाखवली आणि त्याच लोक भावनेतून आपला संपूर्ण आयुष्य बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणासाठी समाजकारणासाठी सहकारासाठी समर्पित केलं. 1999 ला माननीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना माननीय साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळात माननीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने शिक्षण खात्यासारख्या मंत्रीपदाची शपथ घेतली शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्याची संधी माननीय शरद पवार साहेबांनी मा. साहेबांना प्राप्त करून दिली त्या संधीचा सोन करत असताना मग विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात व शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील कोणताच मुलगा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी शासन दरबारी धोरणात्मक निर्णय घेऊन शिक्षण खात्याचा कार्यभार सांभाळत असताना मा साहेबांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या शैक्षणिक दृष्ट्या विकास होण्यासाठी हातभार लावला आणि महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक तयार केले बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला शिक्षणाचा अधिकार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यानंतर माननीय साहेब 2004 ते २००९मध्ये सुद्धा मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना माननीय विलासराव देशमुख साहेब यांच्या मंत्रिमंडळात माननीय साहेबांनी महसूल मंत्री म्हणून शपथ घेतली व पवार साहेबांनी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी माननीय शरद पवार साहेबांनी साहेबांना दिली सहकाराच्या माध्यमातून राजकारणात आलेले साहेब त्यांना शेतकऱ्यांच्या बद्दल प्रचंड आसता होती शेतकऱ्यांच्या वेदनेची जाणीव होती शेतकऱ्यांबद्दल प्रचंड प्रेम होते त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असलेल महसूल खातं शेतकऱ्यांशी निगडित असल्यामुळे बळीराजाला कशाप्रकारे सहकार्य करता येईल त्याला आत्मनिर्भर करता येईल त्याला उभं कसं करता येईल त्यांना शासनाची कशाप्रकारे मदत करता येईल याचाच विचार माननीय साहेबांच्या डोक्यात नेहमी राहत होता मला आजही आठवतं मी त्यावेळेस बारावीच्या वर्षात चिखली येथे शिवाजी महाविद्यालयात शिकत असताना विदर्भातील विशेषता बुलढाणा जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी त्यावेळेस प्रचंड अडचणीत आला होता त्याच्यावर आसमानी सुलतानी संकट आले होते त्यावेळेस विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच कपाशीवर लाल्या नावाचा रोग आला होता त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचे कापसाचे पीक धोक्यात आले होते नष्ट झाले होते त्यामुळे बळीराजा प्रचंड खसला होता त्या बळीराजाला जगवण्याचे काम त्यावेळेस माननीय साहेब महसूल राज्यमंत्री असल्यामुळे त्यांनी ते केले हे दुःख कळत होतं म्हणून हा कपाशीवरचा लाल्या रोग आल्यामुळे प्रचंड शेतकऱ्याचे नुकसान झाले होते हा विषय साहेबांनी शासनाच्या दरबारी लावून शेतकऱ्यांना माझ्या बळीराजांना या संकटातून कशा रीतीने बाहेर काढायचं कशा रीतीने यांना मदत करायची त्यावेळी चे मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख साहेब हे सुद्धा शेतकऱ्याबद्दल अत्यंत संवेदनशील साहेबांनी हा सगळा विषय लावून धरल्यानंतर शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेस शासनाने मदत केली त्यांच्या संपूर्ण श्रेय माननीय साहेबांना जातं हा शेतकऱ्यांसाठी जगणारा राजकारणी एका संवेदनशील राजकारणी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला साहेबांची ओळख आहे. या साहेब महसूल मंत्री असताना सिनखेडराजा मतदारसंघातील सर्वात मोठे धरण असलेले खडकपूर्णा धरणाचे काम चालू होते धरणाचे काम चालू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अनेक प्रकल्पग्रस्तांचे अनेक भूसंपादनाचे प्रश्न त्यावेळी जिल्ह्यामध्ये होते माननीय साहेब पालकमंत्री असल्यामुळे महसूल मंत्री असल्यामुळे साहेबांनी अत्यंत पोटतिडकीने संपूर्ण महसूल चे प्रकारणे मार्गी लावले त्यावेळेस जिल्ह्यात अनेक महसूलच्या इमारती उभ्या राहिल्या याचा संपूर्ण श्रेय माननीय साहेबांना जातं महसूल मंत्री म्हणून सुद्धा साहेबांचा बुलढाणा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील साहेबांचे खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे ते आपल्याला विसरता येणार नाही. त्यानंतर माननीय साहेब 2009 ते 14 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सिनखेडराजा मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून आले माननीय अशोक चव्हाण व पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात सुद्धा माननीय शरद पवार साहेबांनी माननीय साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देऊन एक डॉक्टर असणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये महाराष्ट्राचा आरोग्य सुधारावा म्हणून साहेबांनी साहेबांना आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची संधी प्राप्त करून दिली त्या दृष्टिकोनातून साहेब स्वतः डॉक्टर असल्यामुळे व वैद्यकीय क्षेत्राच ज्ञान असल्यामुळे त्या कालखंडात महाराष्ट्राच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले गोरगरीब गरजू आणि समाजातील सगळ्या क्षेत्रातील लोकांना निःशुल्क आरोग्य सेवा मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले एखाद्या खात्यात एकदा घेतलेला धोरणात्मक निर्णय तो अविरतपणे चालू असतो त्याचा फायदा मात्र दीर्घकालीन असतो महाराष्ट्राच्या आरोग्याच्या बाबतीत आज जे काही आपण सक्षम आहोत त्याच्यात निश्चितच माननीय साहेब आरोग्य मंत्री असताना त्यांचा खारीचा वाटा आहे त्यामुळे साहेब आरोग्य मंत्री असताना बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ट्रामा केअर सेंटर असेल अनेक आरोग्य खात्यातील इमारती असेल यामध्ये साहेबांचे योगदान खूप मोठे आहे त्यामुळे कोरोना सारख्या काळामध्ये आपल्याला आरोग्य खात्यात सगळ्या उपाययोजना साहेबांच्या काळात केलेल्या असल्यामुळे मूलभूत मूलभूत गोष्टींमध्ये लक्ष घातल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला नक्कीच कोरोनाच्या काळात झाला. त्यानंतर मा. साहेबांनी 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली नाही मी अगोदरही म्हटलं की साहेबांच्या प्रेमात लोक का पडतात कारण राजकारणात अनेक लोक होऊन गेली अनेक लोक आजही महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात काम करतात परंतु साहेबांचे वेगळेपण कार्यकर्त्याला जोपासण्याची हातोटी कार्यकर्त्यांवर निस्वार्थी प्रेम त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या काळजावर साहेब राज करतात राजकारणातील निस्वार्थी निःपक्षपाती पने काम करणारा निर्मळ मनाचा एक भला माणूस शेतकऱ्यांची असलेली बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला जोपर्यंत शासन मदत करत नाहीत तोपर्यंत मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही असं ठामपणे सांगणारा जिल्ह्यातील एकमेव राजकारणी सत्तेसाठी खुर्चीसाठी काय करत नाही परंतु बुलढाणा जिल्हा सहकारी बँक माझ्या शेतकऱ्यांचे आत्मा आहे आणि ही बँक माझा प्राण आहे त्यामुळे आपल्या आमदारकीला लाथ मारणारा महाराष्ट्रातला एकमेव माणूस म्हणजे माननीय साहेब बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक पूर्व पदावर आल्यानंतर माननीय साहेबांनी निवडणूक लढवली. बोले तयसे चाले..त्याची वंदावी पावले म्हणजेच साहेब..या उक्तीप्रमाणे साहेब वागले या उक्तीप्रमाणे क्तीप्रमाणेच साहेबांचा राजकारणातला समाजकारणातला वावर आहे. त्यानंतर माननीय साहेबांनी 2019 ची विधानसभेची निवडणूक लढवली व साहेब या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाले माननीय शरद पवार साहेबांचा माननीय साहेबांवर सुद्धा तितकच निस्वार्थी प्रेम मा साहेबांचा सुद्धा माननीय शरद चंद्र पवार साहेबावर तितकाच निस्वार्थी प्रेम कारण कारण साहेबांच्या जडणघडणीत मोठे साहेब गेल्यानंतर पवार साहेबांचे खूप मोठे योगदान सहकारातील असेल राजकारणातील असे अनेक ठिकाणी माननीय पवार साहेबांनी साहेबांना काम करण्याची संधी निर्माण करून दिली 2019 च्या विधानसभा निवडणूका झाल्यानंतर सत्ता महाराष्ट्रात येईल असं कोणालाही वाटत नव्हतं परंतु अशक्य ते शक्य करून दाखवण्याची धमक महाराष्ट्रात फक्त पवार साहेबांनमध्ये आहे त्याच जोरावर महाराष्ट्रामध्ये माननीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये चमत्कार केला व महाराष्ट्रात महाविकासा आघाडी स्थापन करून महाराष्ट्रातील तीन पक्षाचे सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात साहेबांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा साहेबांनी जबाबदारी स्वीकारली आम्ही सर्व मित्रमंडळी मुंबई येथे राजभावनामध्ये या शपथविधीचे साक्षीदार आहोत परंतु काहीच कालखंडामध्ये महाराष्ट्रावर देशावर जगावर कोरोना सारख्या महाभयंकर संकट ओडवले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या देशापुढे महाराष्ट्र पुढे गंभीर प्रश्न निर्माण झाले ते होत असताना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय राजेश टोपे साहेब आरोग्य मंत्री आणि त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर या तिघांवर सुद्धा महाराष्ट्राची खूप मोठी जबाबदारी आली ती पार पाडत असताना या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारची काय अगोदर कल्पना नसताना आणि अचानकपणे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन सरकारने लावल्यानंतर पहिल्यांदा आपण महाराष्ट्र थांबताना बघितला मुंबई सुद्धा पहिल्यांदाच थांबली लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रामध्ये सरकार पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या त्या रोजगाराच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील आरोग्याच्या असतील अशा असंख्य प्रश्नाचा भडिमार महाराष्ट्र पुढे त्यावेळेस होता लोकांचे प्राण वाचवणे त्यांच्या जीवित्वाची हमी देणे अनेक लोकांचे त्यावेळेस प्राण सुद्धा जात होते माणूस माणसापासून दुरावत चालला होता घरातला माणूस गेल्यावर सुद्धा त्याच्या अंत्यविधीच्या विधीला आपण उपस्थित राहू शकत नव्हतो अशा परिस्थितीत एका महाभयंकर संकटाला आपण सामोरे जात असताना महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस सुरक्षित कसा राहील याची काळजी घेण्यासाठी मा. डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते व उपायोजना करत होते त्यावेळेस ऑक्सिजनचा प्रश्न अत्यंत गंभीर होता परंतु साहेबांनी आपल्यात असलेल्या संपूर्ण कौशल्याचा वापर करून त्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेक लोकांची आपल्या प्राणाची चिंता न करता अनेक लोकांचे प्राण वाचवले त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन अनेक लोकांना सुख सुविधा निर्माण करून दिल्या बुलढाणा जिल्ह्याला मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा साठा औषधांचा साठा रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आणि खऱ्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पालकत्व स्वीकारले व ते यशस्वीरित्या पार सुद्धा पाडले त्यामुळे खऱ्या अर्थाने साहेब माझे कोरोना युद्ध म्हणून त्यांचा माननीय पवार साहेबांच्या व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान सुद्धा करण्यात आला कोरोनाय योध्याचा वाढदिवस 30 मार्च रोजी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व लोक उपयोगी उपक्रमातून दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा होत असतो महाराष्ट्राच्या राजकारणातील सहकारातील राजहंस माणूस म्हणजे साहेब माननीय अजित दादा गेल्याचे शल्य आजही मनामध्ये ठेवून संवेदनशील पणे काम करणारा राजकारणातला एक भला माणूस एक देव माणूस निवडणुकीपुरताच राजकारण करणारा उर्वरित 364 दिवस समाजकारणाचा ध्यास घेतलेला जातीपातीच्या राजकारणाच्या भिंतीत न अडकलेला राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची नेहमीच सोडवणूक झाली पाहिजे हा ध्यास मनाशी बाळगून काम करणारा माणूस एक भला माणूस सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून प्रत्येक समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी कृतीमुळे काम करणारा 35 वर्ष सतत लोकांसाठी लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवणारा एक मोठ्या मनाचा लोकनेता सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारा सर्वसामावेशक लोकनेता व सर्वच कार्यकर्त्यांचे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे साहेब म्हणजे माननीय डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब.अशा लोकनेते याचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक लोकउत्सव असतो परंतु मा अजितदादांच्या जाण्याने सगळा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना आणि आपला एक जीवाभावाचा सहकार्य केल्यानंतर आपण वाढदिवस साजरा करताना माझ्यासारखेच म्हणाला ते अजिबात पटत नाही म्हणून संपूर्ण कार्यकर्त्यांना आवाहन करून माझा वाढदिवस साजरा करू नये हे सांगणारे लोकनेते म्हणजे मा डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब.साहेब आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तम आरोग्य दीर्घ निरोगी आयुष्य लाभो महाराष्ट्राचे देशाची आणि बुलढाणा जिल्ह्यातील तमाम शेतकरी शेतकऱ्याची कष्टकऱ्यांची दिनदुबळ्यांची सेवा करण्याची सेवा करण्याची उत्तरोत्तर अशीच संधी मिळत राहो साहेब आपल्यासाठी कार्यकर्ता म्हणजे जीव की प्राण आणि साहेब तुम्ही म्हणजे आमच्यासाठी आमचा जीव की प्राण त्या निमित्ताने साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य दीर्घ निरोगी आयुष्य लाभो हीच मासाहेब जिजाऊ चरणी निरपेक्ष प्रार्थना. साहेब प्रेरणांचे उत्सहाचे बळकट स्नायू साहेब मरणासन्न काळात तुडुंब प्राणवायू साहेबकरती आपलाच जप समर्थक खंदे साहेब आपण आहात लाखाचे पोशींदे साहेब..आमची दिशा आमची पार्टी आमचा पक्ष साहेब कार्यकर्त्यावर सदा सर्वदा मायाळू लक्ष साहेब साहेब एक साहेब साहेब दुनी साहेब साहेब ञिक साहेब..वेळप्रसंगी वज्राहून कठीण कधी मेणाहुन लवचिक साहेब..
