कार्यशाळेतील सांघीक भावना अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. एसडीओ जोगी.मेहकरमध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्यांची एकदिवशीय कार्यशाळा संपन्न…..!!

IMG-20260330-WA0003

निलेश कोल्हे

बुलढाणा:- जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये मेहकर येथे ग्राममहसूल अधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.सांघिक कार्यशाळेतून आपलेपणाची आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होत असते. प्रशासन आणि कायद्यांचं संपूर्ण ज्ञान असलं तरी प्रत्यक्ष अनुभवातील विचारांची आदान प्रदान केल्यामुळे नाविन्याचीही निर्मिती होते. त्याचबरोबर काही त्रृटी दोष असल्यास कार्यशाळेतील सामूहिक संवादातून त्या दूर होतात. ज्यामुळे जनसामान्यांच्या सेवेसाठी महसूल अधिकाऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होते. असे मत उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी व्यक्त केले. महसूल आणि वन विभागाच्या निर्देशानुसार प्रांत स्तरावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन प्रत्येक विभागात करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर मेहकर उपविभागीय कार्यालय अंतर्गत सदर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच (24 मार्च) रोजी करण्यात आले होते.यावेळी सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, मेहकर उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, प्रबोधनकार अँड.सतीशचंद्र रोठे पाटील,मेहकर तहसीलदार निलेश मडके, लोणार तहसीलदार भूषण पाटील,जनार्दन बंगाळे, चौधरी सर आदी महसूल अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत चाललेल्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आर्थिक नियोजन, गतिमान प्रशासन, महसूल प्रशासनातील नवे जी.आर, ऐ.आय टेक्नॉलॉजी यासह आनंदी जीवनातून प्रशासकीय कर्तव्य आदी महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थित मान्यवरांनी समयोचीत अभ्यासपूर्ण प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे नियोजनबद्ध संचालन महसूल विभागाचे प्रवीण देशमुख यांनी केले.लोणार,मेहकर तालुक्यातील सर्वश्री ग्रामविकास अधिकारी, महसूल अधिकारी यांनी पूर्ण वेळ कार्यशाळेला शंभर टक्के उपस्थिती लावत आपल्या अनुभवातील काही प्रसंगही यावेळी व्यक्त केले.वेळीच कर्तव्याचे पालन केल्यास तणावातून मुक्तता मिळते. प्रा.संजय खडसे.प्रशासकीय कामाकाजाशी निष्ठा ठेवत पारिवारिक जबाबदाऱ्यांचेही योग्य वेळी पालन केल्यास आपण तणाव मुक्त राहू शकतो. आनंददायी जीवन जगण्यासाठी जबाबदाऱ्यांचे नियोजन वेळीच होणे कर्मप्राप्त आहे.असं मत प्रथम सत्रात उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा प्रा.संजय खडसे यांनी व्यक्त केले.अधिकाऱ्यांनी सकारात्मकता ठेवल्यास सर्वांगीण विकास होतो. अँड.रोठे पाटील शारीरिक दृष्ट्या सक्षम अधिकारी मानसिक दृष्ट्या ही सक्षम असतो. त्यासाठी दैनंदिन एक तास वेळ राखीव ठेवलाच पाहिजे.मोबाईलचा अतिवापर आणि जीवन पद्धती बदलल्यास परिवारातही आनंदी राहता येते. तेव्हाच अधिकाऱ्यांची दिनचर्या सकारात्मक होते. अधिकाऱ्यांच्या सकारात्मक दिनचर्येमुळे प्रशासकीय गती येऊन जनसामान्यांना मोठा आधार,दिलासा मिळतो. ज्यामुळे जनसामान्यांना आणि अधिकाऱ्यांनाही विकासाची ऊर्जा प्राप्त होते. समारोपीय सत्रात आनंदी जीवन आणि प्रशासनातील गतीमानता या विषयावर मनोगत व्यक्त करताना प्रबोधनकार रोठेंनी उपरोक्त मत व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!