खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप; सरपंच नलिता गरड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर​पतीचा हस्तक्षेप आणि विकासकामांत अनियमिततेचा ठपका; ९ सदस्यांनी नोंदवला विरोध​

Screenshot_2026-03-30-17-36-08-68_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

सिंदखेडराजा ( अनिल दराडे ):तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून धगधगत असलेल्या सत्तासंघर्षाचा अखेर स्फोट झाला. सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरड यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव सोमवारी (३० मार्च) विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. या निकालामुळे ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून, सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.​तहसीलदारांच्या उपस्थितीत विशेष सभाग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत अविश्वास ठरावाचे पत्र प्रशासनाकडे सादर केले होते. त्यानुसार तहसीलदारांच्या निर्देशानुसार आज ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत ठरावावर सविस्तर चर्चा होऊन मतदान प्रक्रिया पार पडली.​सरपंचांवर गंभीर आरोपांची सरबत्तीअविश्वास ठराव मांडताना ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढले. सरपंच कोणतेही निर्णय घेताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, असा मुख्य आरोप करण्यात आला. ठरावात नमूद केल्यानुसार विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून प्रशासकीय समन्वयाचा अभाव आहे.​ जनहिताच्या आड येणारे निर्णय घेतल्याने गावातील विकासकामे ठप्प झाली आहेत.​पतीचा हस्तक्षेप: विशेष म्हणजे, सरपंचांच्या पतीकडून ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजात सतत हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी केला आहे.​९ सदस्यांचे ठरावाला समर्थनसभेत झालेल्या मतदानावेळी बहुमताने हा ठराव पारित करण्यात आला. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्धन विक्रम नागरे, मीनाक्षी विनोद म्हस्के, सुनीता सुरेश भालेकर आणि स्वाती शिवानंद खेडेकर या नऊ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करत स्वाक्षऱ्या केल्या.​गावात चर्चेला उधाणअविश्वास ठराव मंजूर झाल्याने नलिता गरड यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. या निकालामुळे खैरव-बारलिंगा परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, पुढील सरपंच म्हणून कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निकालामुळे विरोधकांनी जल्लोष केला असून गावातील वातावरण राजकीयदृष्ट्या तापले आहे.

You may have missed

error: Content is protected !!