बुलढाण्याचे सुपुत्र दीपक महाराज सावळे यांना राज्यस्तरीय ‘व्यसनमुक्ती पुरस्कार’ प्रदान ​मुंबईत मान्यवरांच्या हस्ते गौरव; दीड दशकाच्या समाजप्रबोधन पर्वाचा सन्मान….​

Screenshot_2026-03-30-20-48-39-61_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):गेल्या १५ वर्षांपासून ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अस्वच्छतेवर प्रहार करणारे राष्ट्रीय युवा कीर्तनकार ह.भ.प. दीपक महाराज सावळे यांना राज्य शासनाचा मानाचा ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात २६ मार्च रोजी एका दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.​बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील रहिवासी असलेले दीपक महाराज सावळे यांनी आपल्या रसाळ कीर्तनातून आणि संस्कार शिबिरांच्या माध्यमातून युवा पिढीला सन्मार्ग दाखवण्याचे कार्य केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा चालवत त्यांनी खेड्यापाड्यात व्यसनमुक्तीचा जागर केला. त्यांच्या याच अविरत कार्याची दखल राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतली आहे.​मान्यवरांची उपस्थिती:या सोहळ्याला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, प्रधान सचिव दीपा मुधोळ, आयुक्त हर्षदीप कांबळे, ओएसडी सिद्धार्थ भंडारे आणि प्रसिद्ध सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दीपक महाराज सावळे व त्यांच्या पत्नी सौ. किरण सावळे यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.​

अष्टपैलू समाजप्रबोधन:दीपक महाराज केवळ कीर्तनकारच नव्हे, तर एक उत्तम संघटक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी:​

ग्रामस्वच्छता: गावोगावी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.​व्यसनमुक्ती: दारू, तंबाखू यांसारख्या व्यसनांपासून तरुणांना परावृत्त केले.​संस्कार शिबिरे: मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले.​

अंधश्रद्धा निर्मूलन: समाजातील बुवाबाजी आणि अनिष्ट प्रथांविरुद्ध प्रबोधन केले.​”हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून ग्रामगीतेच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि श्रोत्याचा सन्मान आहे. व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी हे कार्य यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील.”— ह.भ.प. दीपक महाराज सावळे

You may have missed

error: Content is protected !!