लोणार शहरातील हा रस्ता बनला अपघात स्थळ न. पा. प्रशासन कधी जगणार
Oplus_16777216
लोणार (यासीन शेख) : मंठा रोड पासून गुलाबखा महोल्ला, माळीपुरा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन दिवसापूर्वी भूमिगत लाईनचे काम करण्यात आले. दोन दिवसापासून सुरु असलेल्या पाऊस सुरु असून या रोड वर माती दाबून मोठमोठे खड्डे पडले आहे. चारचाकी वाहनांना मोठी कसरत करावी लागत असून दुचाकी स्लिप होऊन या ठिकाणी अपघात घडत आहे. झालेल्या या अडचणींचा सामना नागरिक करत आहे. दोन दिवस उलटून सुद्धा तरी न. पा. प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही न. पा. प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघताय का असा सवाल या ठिकाणी राहणारे नागरिक करत आहे.
