यशोगाथा: बुलढाण्याच्या ‘डॅडी’ ब्रँडची कोट्यवधींची झेप; सौ. शिल्पा बुराड यांचा ‘स्वयंसिद्धा’ पुरस्काराने गौरव
बुलढाणा( एकनाथ माळेकर): शेतीमालावर प्रक्रिया करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या एमआयडीसी येळगाव येथील ‘बुराड ॲग्रो फूड इंडिया एलएलपी’ च्या संचालिका सौ. शिल्पा मनोज बुराड यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा प्रतिष्ठित ‘स्वयंसिद्धा २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. थेट शेतकरी खरेदी आणि नाविन्यपूर्ण प्रक्रियेसाठी हा सन्मान त्यांना मिळाला आहे.तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाची साथसौ. शिल्पा बुराड यांनी ‘डॅडी’ (DADDY) ब्रँड अंतर्गत बटाटा चिप्स, फराली मिक्स आणि खाकरा उत्पादनात मोठी मजल मारली आहे. या यशात कृषी विज्ञान केंद्र (KVK), बुलढाणा यांच्याकडून मिळालेल्या नवनवीन संकल्पना (Ideas) आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. तसेच, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय (DSAO) यांच्याकडून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे प्रकल्पाला भक्कम आधार मिळाला आहे. SS-304 फूड-ग्रेड मशिनरी आणि पर्यावरणपूरक ईटीपी प्लांट ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.७-८ महिन्यांत १ कोटीची उलाढाल१ जुलै २०२५ रोजी सुरू झालेल्या या प्रकल्पाने अवघ्या ७-८ महिन्यांत १ कोटी रुपयांची यशस्वी उलाढाल (Turnover) केली आहे. सुरुवातीच्या काळात उत्पादन आणि मागणीचा ताळमेळ बसवण्याचे आव्हान पेलत, आता प्रतिदिन १ टन उत्पादन क्षमता गाठली आहे. या युनिटद्वारे १५ जणांना रोजगार मिळाला असून ५ मोठे वितरक जोडले गेले आहेत.पुढील उद्दिष्ट: २ कोटींचे लक्ष्यचालू आर्थिक वर्षात २ कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून विस्तार आणि निर्यातीचे (Export) स्वप्न सौ. बुराड यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.”केव्हीके बुलढाणा यांनी दिलेल्या नवनवीन कल्पना आणि जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळेच आम्ही ही भरारी घेऊ शकलो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव आणि ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने देणे हेच आमचे ध्येय आहे.”— डॉ. सुकेशनी वाणे, विषय विशेषज्ञ, कृषि अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा. 9423473629
