खळबळजनक! खामगावात तहसीलदार सुनील पाटलांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न; ‘सिनेस्टाईल’ पाठलाग करून वाळू माफिया मुसक्या आवळल्या​

Screenshot_2026-03-31-12-42-15-38_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

खामगाव ( बुलढाणा माझा न्युज ):तालुक्यातील पारखेड शिवारात अवैध वाळू माफियांनी थेट प्रशासनालाच आव्हान दिल्याची धक्कादायक घटना सोमवार, ३० मार्च रोजी घडली. अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाहन घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न रेतीमाफियांनी केला. मात्र, डगमगून न जाता तहसीलदार सुनील पाटील यांनी जिगरबाज वृत्ती दाखवत ”सिनेस्टाईल” पाठलाग करून मुजोर वाहनचालकाला जेरबंद केले.​नेमकी घटना काय?​मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार सुनील पाटील हे सोमवारी आपल्या खासगी वाहनाने खामगाव-नांदुरा मार्गावरील पारखेड शिवारात गस्तीवर होते. यावेळी त्यांना वाळूची अवैध वाहतूक करणारे टिप्पर (क्र. MH 28 BB 7314) दिसून आले. तहसीलदारांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता थेट तहसीलदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि तेथून पळ काढला. या थरारात तहसीलदारांच्या गाडीला कट लागल्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे.​नॅशनल हायवेवर थरार!​वाहनचालकाने चकमा देऊन पळ काढल्यानंतर तहसीलदार पाटील यांनी हार न मानता तात्काळ आपल्या वाहनाने त्याचा पाठलाग सुरू केला. नॅशनल हायवेवर काही अंतर पाठलाग केल्यानंतर, एका मुरमाच्या ठिकाणी तहसीलदारांनी धाडसाने आपले वाहन डंपरसमोर आडवे लावून मुजोर चालकाला रोखले.​गुन्हा दाखल, महसूल विभागात खळबळ​तहसीलदारांनी सदर वाहन जप्त केले असून स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीवरून संबंधित वाहनचालकाविरुद्ध कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, वाळू माफियांविरोधात प्रशासनाने आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे.​”पारखेड शिवारात अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून मी गस्तीवर होतो. वाहन थांबवण्याचा इशारा दिला असतानाही चालकाने भरधाव वेगाने वाहन अंगावर आणून मला घातपात करण्याचा प्रयत्न केला. अखेर पाठलाग करून त्याला पकडले असून कठोर फौजदारी कारवाई केली जात आहे.”

You may have missed

error: Content is protected !!