मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया मोहिमेचे आयोजन…!आतापर्यंत ३५०० हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वी; मनोजभाऊ दांडगे यांचा पुढाकार…!
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):आर्थिक परिस्थितीअभावी शस्त्रक्रिया रखडलेल्या मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ज्ञानदेवराव दांडगे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमांतर्गत गरजू रुग्णांवर जळगाव खान्देश येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, यासाठी सोमवार, दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी मोफत बस रवाना होणार आहे.मासरूळ परिसरातील अनेक कुटुंबांमध्ये गंभीर आजार असूनही पैशांच्या टंचाईमुळे शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन मनोजभाऊ दांडगे (अध्यक्ष, चिखली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या माध्यमातून ही मोफत आरोग्य सेवा राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेद्वारे आतापर्यंत ३५०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे.मोफत प्रवास आणि उपचार:निवड झालेल्या रुग्णांना जळगाव खान्देश येथील रुग्णालयात नेण्यासाठी चिखलीतून मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च, औषधोपचार आणि प्रवासाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.नाव नोंदणीचे आवाहन:ज्या रुग्णांना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे, अशा मासरूळ सर्कल मधील सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. ही गाडी सोमवारी (६ एप्रिल) रवाना होणार असल्याने, इच्छुक रुग्णांनी तत्काळ संपर्क क्रमांकावर आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मनोज दांडगे यांनी केले आहे.ठळक वैशिष्ट्ये: सोमवार, ६ एप्रिल २०२६. *जळगाव खान्देश (प्रवास मोफत). मासरूळ जि. प. सर्कल मधील सर्व जनता.श्री. विनोद तायडे: ७०५७३८५३४३*श्री. निलेश हिवाळे: ७०६६४१२७४५
