विशेष सहाय्य योजने अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अर्थसहाय्य मिळण्याकरीता दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) सादर करणे अनिवार्य….
चिखली( एकनाथ माळेकर)शासनाकडून विशेष सहाय्य योजने अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अर्थसहाय्याचे वितरण करण्यांत येते. शासनाने, महाराष्ट्र शासन, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, शासन निर्णय क्रमांक: दिव्यांग-2026/ प्र.क्र.33/कार्यासन-1 दिनांक 27 मार्च 2026 अन्वये सदर अर्थसहाय्य वितरणाकरीता प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याकडे दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) अनिर्वाय केलेले आहे. त्याअनुषंगाने सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा UDID क्रमांक DBT पोर्टलवर अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. करीता विशेष सहाय्य योजनेच्या ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप त्यांचे UDID क्रमांक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र व आधार कार्ड ची छायांकीत प्रत तहसिल कार्यालयात जमा केलेली नाही, त्यांनी तात्काळ प्रमाणपत्राची छायांकीत प्रत तहसिल कार्यालयात जमा करावी. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID क्रमांक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र) नाही, अशा लाभार्थ्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, चिखली यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद UDID पोर्टलवर करुन घ्यावी. शासन निर्देशानुसार UDID प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांला पुढील महिन्याचे अर्थसहाय्य वितरीत होणार नाही. ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी दिव्यांग प्रमाणपत्राकरीता शिबीर आयोजित केल्या जातो. सदर शिबीराचा लाभ घेऊन दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) प्राप्त करुन घ्यावे, असे श्री.विजय सवडे, तहसिलदार चिखली यांच्यांकडून सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आवाहन करण्यांत येत आहे.
