सेवानिवृत्तीच्या दिवशीच रजा रोखीकरण आदेश; उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांची संवेदनशीलता अधोरेखित

Screenshot_2026-04-02-20-03-05-09_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) अढेरा येथील मंडळ अधिकारी पी. टी. केदार हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच रजा रोखीकरणाचा आदेश देण्यात आल्याने प्रशासनातील संवेदनशीलता आणि कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळाले.सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध लाभांपैकी रजा रोखीकरण हा अत्यंत महत्त्वाचा लाभ मानला जातो. या संदर्भात तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ यांनी वेळेवर प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशीच आदेश निर्गमित केले.यावेळी मंडळ अधिकारी पी. टी. केदार यांचा सत्कारही करण्यात आला. त्यांच्या दीर्घ सेवाकाळातील कार्याचा गौरव करण्यात आला असून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.प्रा. संजय खडसे यांच्या या निर्णयामुळे कर्मचारीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनातील मानवी मूल्ये आणि संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

You may have missed

error: Content is protected !!