सिंदखेड राजा तहसीलचा ‘डिजिटल’ स्ट्राईक! तांत्रिक बिघाडानंतरही ३० मार्च रोजी एकाच दिवसात १९७ विद्यार्थ्यांच्या हाती पडली प्रमाणपत्रे….

IMG-20250910-WA0013

सिंदखेड राजा (अनिल दराडे) आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस (३१ मार्च) जवळ आलेला असताना आणि त्या दिवशी सुट्टी असल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सिंदखेड राजा तहसील कार्यालयाने ‘मिशन मोड’वर काम करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्रे रखडली होती, मात्र प्रशासकीय चिकाटीमुळे आज ३० मार्च रोजी एकाच दिवसात १९७ विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.बुलढाणा ते मुंबई… तांत्रिक अडथळ्यांची भिंत अशी पाडली!प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोर्टलवर मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपत असल्याने व त्या दिवशी सुट्टी असल्याने, ३० मार्च रोजीच ही प्रमाणपत्रे मिळणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य होते. ही निकड ओळखून तहसीलदार अजित दिवटे यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. जिल्हा प्रशासनाने थेट मुंबई येथील मुख्य कार्यालयाशी समन्वय साधून तांत्रिक बिघाड दुरुस्त करून घेतला आणि सिंदखेड राजाची ‘साईड’ पुन्हा कार्यान्वित केली. *अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘ओव्हरटाईम’ कामगिरी* या मोहिमेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यामध्ये प्रामुख्याने खालील अधिकाऱ्यांचा सहभाग राहिला:निवासी उपजिल्हाधिकारी: सन्माननीय कवळे साहेब,उपविभागीय अधिकारी (SDM): संजय खडसे साहेब ,तहसीलदार: अजित दिवटे साहेब ,निवासी नायब तहसीलदार: प्रांजल पवार मॅडम, ग्राउंड लेव्हल ला अथक परिश्रम महसूल सहाय्यक: संजय सोनुने यांनी खुप खुप परिश्रम घेतले व बोरकर साहेब (सेतू लिपीक) यांनी सहकार्य केले. *_विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान_* उत्पन्न, अधिवास (डोमिसाईल), वय, राष्ट्रीयत्व आणि रहिवासी प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी चिंतेत होते. मात्र, ३० मार्चच्या या ‘डिजिटल स्ट्राईक’मुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले आहे. “तांत्रिक अडचण असूनही जिल्हा प्रशासन आणि मुंबई कार्यालयाशी समन्वय साधून आमचे काम मार्गी लावले, यासाठी आम्ही प्रशासनाचे ऋणी आहोत,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.प्रशासकीय संवेदनशीलतेचे हे उदाहरण इतर तालुक्यांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

You may have missed

error: Content is protected !!