प्राचार्य संतोष डवले यांचा ‘प्रेरणादायी नेतृत्व’ पुरस्काराने गौरव; बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक (भाईजी) यांच्या हस्ते सन्मान
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त चाणक्य बहुउद्देशीय संस्था सुंदरखेड द्वारा संचालित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि हरिसिद्धी विद्या धाम अकॅडमी यांच्या वतीने बुलढाणा तालुक्यातील प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालय, धाडचे प्राचार्य श्री. संतोष वसंतराव डवले यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि नाविन्यपूर्ण विद्यार्थी शिक्षण कार्यपद्धतीबद्दल ‘प्रेरणादायी नेतृत्व’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष आदरणीय राधेश्यामजी चांडक (भाईजी) यांच्या शुभहस्ते श्री. डवले यांचा हा सन्मान संपन्न झाला. या सोहळ्याला चाणक्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजयजी गणपत महाजन आणि पी.आर.ओ. सुनीलजी तिजारे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य संतोष डवले यांना मिळालेल्या या गौरवपूर्ण सत्काराबद्दल दांडगे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोजभाऊ दांडगे, विश्वस्त श्री. संतोष दांडगे आणि सचिव श्री. उमेश दांडगे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. श्री.डवले यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रातून आणि धाड परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
