दुसरबीडमध्ये ६८ वर्षापासून देवीच्या सोंगाची परंपरा आजही कायम..!!
सिंदखेडराजा (अनिल दराडे )सालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीला दिनांक ०२/०४/२०२६ रोजी दुसरबीड येथे वाघे मुरळी व देवीच्या सोंगाचा कार्यक्रम आयोजित केला होता.या पारंपारिक वाघे मुरळी व सोंगाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर साहेब,मा.जि.प सदस्य पंडितरावजी खंदारे,मा.सभापती विलासराव देशमुख, लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीणभाऊ गीते, श्रावणदादा डोंगरे,मा.सरपंच प्रकाश सांगळे, इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले...या परंपरेबद्दल सांगायचं झालं की जुन्या काळात करमणुकीचे साधन म्हणून रात्री वाघे मुरळी व सोंगाच्या माध्यमातून गणपती, महादेव-पार्वती,हिरण्यकशिपू वध, प्रल्हाद बाळ,सूर्यनारायण,अस्वल ,मछली, व संपूर्ण रामायण त्यातील सर्व पात्र घेऊन लोकांच्या करमणुकीसाठी असे कार्यक्रम आयोजित करत होते व सकाळी गावातून देवीचे सोंग काढल्या जात असे ही परंपरा जगदंबा पंचकमेटीच्या वतीने ६८ वर्षांपासून आजही कायम आहे..याही वर्षी रात्री ९ वाजेपासून सकाळी ४ वाजेपर्यंत वाघेमुरळी व सोंगाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी ५ वाजता देवीच्या सोंगाची मिरवणूक पारंपारिक वाद्य डफडे वाजून गावातून निघाली व या मिरवणुकीत गावातील सर्व ग्रामस्थ माता-भगिनी देवीच्या सोंगाची मोठ्या भक्ती भावाने पूजा करून या पारंपरिक देवीच्या सोंगाच्या उत्साहात सर्वजण सहभागी झाले.या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या थाटामाटाने पार पडतात.या कार्यक्रमाचे आयोजन सर्वांच्या सहकार्यातून जगदंबा पंचकमिटीच्या वतीने करण्यात आले..!
