जनगणना 2027 साठी प्रा. संजय खडसे व डॉ. रामेश्वर पुरी यांची राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती…

0
IMG-20260228-WA0019

सिंदखेडराजा( अनिल दराडे ) जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब घडली असून प्रा. संजय खडसे (उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा) व डॉ. रामेश्वर पुरी (उपविभागीय अधिकारी, खामगाव) यांची महाराष्ट्र राज्यस्तरावर मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या दोन्ही अधिकाऱ्यांनी नुकतेच पुणे येथील यशदा संस्थेमध्ये चार दिवसांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे. बुलढाणा जिल्ह्यात दि. ६ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील अधिकारी व फिल्ड मास्टर ट्रेनर्स यांना सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात हे प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्स तालुका स्तरावर प्रगणकांना प्रशिक्षण देणार आहेत.जनगणना २०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा मे-जून महिन्यात होणार आहे. यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने प्रशिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागासाठी तहसीलदार तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी यांची चार्ज ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जनगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.प्रा. संजय खडसे व डॉ. रामेश्वर पुरी हे जिल्ह्यातील सर्व शंका निरसन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करणार असून त्यांच्या अनुभवाचा लाभ बुलढाणा जिल्ह्याला होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यात जनगणना २०२७ ही अचूक, पारदर्शक व सुरळीतरीत्या पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!