चांगेफळ येथील ‘आयुष्यमान आरोग्य मंदिरा’त जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा..

0
Screenshot_2026-04-07-19-29-33-39_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) “माझं आरोग्य, माझा अधिकार” हा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी आज ७ एप्रिल २०२६ रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त चांगेफळ येथील ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे गावकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि वाढत्या रोगराईला प्रतिबंध करण्याबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) डॉ. उमेश प्रल्हाद कळंबे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानामुळे पसरणारे आजार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी पाळावयाची खबरदारी त्यांनी स्पष्ट केली. आरोग्य सेवक श्री. गोपाल मोरे यांनी पावसाळा पूर्व घ्यावयाची काळजी आणि शुद्ध पाण्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. यावेळी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन स्वच्छतेचा संदेश देण्याचे आवाहन केले.उपस्थित मान्यवर आणि कर्मचारीया कार्यक्रमाला आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती, यामध्ये:आरोग्य विभाग: डॉ. उमेश प्रल्हाद कळंबे (CHO), श्री. गोपाल मोरे (MPW).आशा सेविका श्रीमती भालेराव, श्रीमती शेजूळ.अंगणवाडी सेविका: प्रिया प्रकाश खरात (तांदुळवाडी), श्रीमती पुष्पा सवडे (चांगेफळ क्र. १), श्रीमती अलका देशमुख (चांगेफळ क्र. ३).ICRP: श्रीमती संघमित्रा तायडे (चांगेफळ).ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला तांदुळवाडी आणि चांगेफळ येथील अंगणवाडी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये शकुंतला बनसोड, रेखा तायडे, सांची तायडे, रूचिता तायडे, राहूल सवडे, अजय चाळशे, महेश मोगल, राम शेळके, विष्णू गंडे, शुभम पराळ, गौरव साबळे, नैतिक वखरे आणि श्याम चाळशे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून केवळ एक दिवस नव्हे, तर वर्षभर आरोग्य नियमांचे पालन करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!