स्वप्नपूर्ती स्कूल&ज्यु.काॅलेज अंचरवाडी येथे अध्यक्ष श्री.एकनाथराव परिहार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दंतचिकित्सा शिबीर व साहित्य वाटप संपन्न

0
Screenshot_2026-04-10-07-32-57-02_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

अंचरवाडी:-परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षण,शिस्त,योग्य संस्कार देण्यासाठी नामांकित असलेल्या स्वप्नपूर्ती स्कूल&ज्यु.काॅलेज,अंचरवाडी चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.एकनाथराव बाबा परिहार यांचा वाढदिवस शाळेत मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मोफत दंतचिकित्सा करण्यात आली विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता आरोग्यदायी सवयी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना टुथपेस्ट,माऊथफ्रेशनर,पेन,पेंसिल इ.चे वाटप करण्यात आले याप्रसंगी तज्ञ डाॅ.मा.विष्णु जाधव साहेब(अष्टविनायक डेंटल क्लिनीक चिखली)व डाॅ.मा.संदीप परिहार साहेब(रेणुका माता डेंटल क्लिनीक चिखली) यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करुन उपचार,औषधी वाटप केले दंतचिकित्सा शिबीराचे उद्घाटन मा.सौ.कोकिळाताई परिहार(सरपंच ग्रा.पं.अंचरवाडी) यांनी केले व शाळा सातत्याने नवनविन उपक्रम आयोजित करुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत असल्याबद्दल गौरवोद्गार काढले तसेच यावर्षी शाळेचा विद्यार्थी पुष्कर भुतेकर हा नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र ठरल्याबद्दल व तालुक्यातील खाजगी शाळांपैकी एकमेव विद्यार्थी स्वप्नपूर्तीचा लागल्याबद्दल अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या तसेच शुभेच्छा देण्यासाठी मा.समाधान पाटील परिहार(संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली) हे आवर्जुन उपस्थित होते त्यानींही शाळेच्या प्रगतीबद्दल शाबासकी दिली.याप्रसंगी संस्थेचे सचिव मा.समाधान परिहार सर व कोषाध्यक्ष मा.रविंद्र परिहार सर यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्राचार्या,शिक्षकवृंद,कर्मचारी यांनी केले विद्यार्थ्यांनी बाबांना Greeting card बनवून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!