अतिक्रमणाच्या विळख्यात चिखली शहर : फुटपाथ गायब, रस्ते अरुंद; अपघातांचा धोका वाढला….!

0
IMG-20260413-WA0002


निलेश कोल्हे.


चिखली : नगरपालिका कार्यालय कडे फुटपाथ वरील अतिक्रमण रस्ता मोकळा करणे बाबत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून तक्रारकर्त राजेंद्रजी लहाने माहिती अधिकार प्रचारक बुलढाणा चिखली येथे शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच नियोजनाचा अभाव आणि अतिक्रमणाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला असून, याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शहरातील फुटपाथ आणि मुख्य रस्त्यांची दुरवस्था इतकी बिकट झाली आहे की, पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
चिखली शहरातील हा फुटपाथ मुद्दा नगरपालिका यांच्या हद्दीत येत असून अनेक प्रमुख मार्गांवर दुकानदारांनी अतिक्रमण करून फुटपाथ अक्षरशः ताब्यात घेतले आहेत. परिणामी, नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित जागाच उरलेली नाही. विशेषतः छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक परिसरात रस्ता अत्यंत अरुंद झाल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
याशिवाय शहरातील मुख्य रस्त्यांची रुंदी कमी असल्याने सकाळ-संध्याकाळ वाहनांची मोठी गर्दी होते. शाळा, बाजारपेठ आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरातही अतिक्रमण वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील अनेक चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे उभारले गेले असले तरी, त्यांच्या सभोवतीही अतिक्रमण वाढले आहे. यामुळे त्या ठिकाणांचा सन्मान राखला जात नाही, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. शहराच्या सौंदर्याला धक्का बसत असून, व्यवस्थापनाच्या अभावाची जाणीव प्रकर्षाने होत आहे.
नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की, तात्काळ अतिक्रमण हटवून फुटपाथ आणि रस्ते मोकळे करण्यात यावेत. तसेच, शहरातील मुख्य चौकांमध्ये लवकरात लवकर ट्रॅफिक सिग्नल बसवून वाहतूक सुरळीत करावी. यासोबतच दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून रस्त्यांचे रुंदीकरण, फुटपाथचे पुनर्निर्माण आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था यासाठी ठोस योजना आखावी.
चिखली शहराचा विकास केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या काळात ही समस्या अधिकच विकोपाला जाण्याची भीती वाटत आहे म्हणून प्रामुख्याने हि तक्रार राजेंद्रजी लहाने यांनी नगरपालिका यांच्या कडे दाखल केली आहे शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!