अडथळा आणाल तर 25 वर्षांचे बाड उघडेल! नगराध्यक्ष सौरभ तायडेंचा अजित पवार गटाला इशारा
सिंदखेडराजा ( अनिल दराडे )नगरपालिका कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर आज राजकीय वातावरण तापले. तक्रारीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी आज शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत विरोधकांवर तोफ डागली. “विकास कामाला सहकार्य करा, अडथळा आणू नका. काही चुकीचे काम असेल तर तक्रार नक्की करा. पण विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर मी 25 वर्षांचे बाड जनतेसमोर आणेल” असा सणसणीत इशारा तायडेंनी नाव न घेता अजित पवार गटाच्या नगरसेवकांना दिला.युवा नगराध्यक्ष सौरभ तायडे म्हणाले की, शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. उगाच राजकारण करून कामे अडवू नयेत. चुकीच्या कामांवर आक्षेप घ्या, पण चांगल्या कामात खोडा घालू नका.नगराध्यक्षांच्या या इशाऱ्यानंतर सिंदखेडराजाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 25 वर्षांचे बाड म्हणजे काय? कोणाची पोलखोल होणार? याचीच चर्चा सध्या शहरात रंगली आहे
