मतदार पुनरीक्षणासाठी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन :: उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे.

0
Screenshot_2026-04-14-15-59-29-07_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेड राजा (अनिल दराडे)मतदारांच्या पडताळणीसाठीसखोल मतदार पुनरीक्षणाची मोहीमेला गती.सिंदखेडराजा अनिल दराडे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी पात्र असलेल्या प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीत आले पाहिजे. मतदान करणे हा प्रत्येक पात्र मतदाराचा अधिकार असून कोणीही यापासून वंचित राहू नये यादृष्टीने सखोल मतदार पुनरीक्षणाची मोहीम निवडणूक विभागाने हाती घेतली आहे. यात पात्र असलेल्या कोणत्याही मतदाराचे नाव वगळले जाणार नाही. जी नावे चुकीची आहेत त्यांना यात दुरुस्तीची संधी मिळावी, नवीन मतदार नोंदणी व्हावी व आहे त्या मतदार यादीतील नावे पडताळून घेता यावीत असा या मोहिमेचा उद्देश आहे. मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओंना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे. या मोहिमेद्वारे ज्या मतदारांची नावे सन 2024 च्या मतदार यादीत समाविष्ट आहेत, त्यांच्या नावांची सन 2002 च्या मतदार यादीतील नावाशी मॅपिंग करण्यात येणार आहे. तसेच ज्या मतदारांची नावे सन 2024 मध्ये आहेत, मात्र सन 2002 मध्ये नसतील, अशा मतदारांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाचे सन 2002 च्या मतदार यादीमधील नावाशी मॅपिंग करण्यात येणार आहे. तसेच ज्या मतदाराचे नाव सन 2024 च्या मतदार यादीत समाविष्ट आहे परंतु त्या मतदाराचे आई वडील किंवा आजी आजोब यांचे नाव सन 2002 च्या मतदार यादीत नाही अशा मतदाराच्या राहत्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष गृहभेट देतील. त्यानंतर त्यांचे आई-वडील किंवा आजी-आजोबा यांचे मूळ रहिवासाचे ठिकाण याबाबत माहिती घेतील.यामध्ये (राज्य, जिल्हा, तालुका, गाव) देखील नोंदविण्यात येईल.यासोबतच, विवाहानंतर स्थलांतरित झालेल्या महिलांच्या बाबतीत त्यांच्या मूळ गावातील कुटुंबीयांची माहिती संकलित करून त्यांची पडताळणी केली जाणार आहे. ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर ती https://voters.eci.gov.in⁠ या संकेतस्थळावर अपलोड करून सन २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा उपविभागातील सर्व मतदारांनी सर्व मतदार याद्या अधिक अचूक पारदर्शक करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.ज्यांच्या काही अडचणी असतील अथवा कुणाच्या पडताळणीबाबत शंका असतील तर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्या सोडविता येतील. आधार व इतर निकषाप्रमाणे मतदार नोंदणी चुकीची असल्याचे निदर्शनास आले तर त्याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यलयात याबाबत सुनावणी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!