वर्दडीत भिमजयंतीनिमित्त संविधान पुस्तिका वाटपाचा दिमाखदार सोहळा, आमदार कायंदे यांच्या हस्ते उद्घाटन…
सिंदखेडराजा (अनिल दराडे) वर्दडी बु. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती सिंदखेड राजा व ग्रामपंचायत वरदडी च्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला जाणार आहे. यावेळी पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचनालय सुरू केले जाणार आहे. गटविकास अधिकारी अजित बांगर यांच्या कल्पनेतून उद्या तालुक्यात अजून एक वाचनालय सुरू होत आहे.तसेच गावकऱ्यांना संविधान पुस्तिकांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय यावेळी अनुसूचित जाती महिला बचत गटास कर्ज वाटप सुद्धा केले जाणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मनोजभाऊ कायंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मा. संजय खडसे साहेब राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी मा. अजितकुमार बांगर साहेब उपस्थित राहणार आहेत.*आयोजकांची फळी सज्ज*हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच सौ. पुष्पाबाई मधुकर ईनकर, उपसरपंच श्री. मधुकर निवृत्ती ईनकर, ग्रामपंचायत अधिकारी मा. प्रशांत पाटसकर यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामपंचायत कार्यालय व समस्त गावकरी मंडळी सज्ज झाली आहेभिमजयंतीच्या या पवित्र दिनी संविधानाच्या मूल्यांचा जागर करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.*स्थळ:* ग्रामपंचायत सार्वजनिक वाचनालय, वर्दडी बु. ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा
