कव्हळा जिल्हा परिषद शाळेची राज्यस्तरावर झेप; परियश पऱ्हाड राज्यात १५ वा​मंथन राज्यस्तरीय परीक्षेत यश : विभागातून पटकावला पाचवा क्रमांक….

0
IMG-20260414-WA0061

​कव्हळा ( बुलढाणा माझा न्युज ):येथील पीएम-श्री (PM-SHRI) जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत’ शाळेचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी परियश विलास पऱ्हाड याने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत १५ वा क्रमांक पटकावून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.​परियश याने ३०० पैकी २७० गुण प्राप्त करून विभागात पाचवा आणि राज्यात १५ वा क्रमांक मिळवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षेत दाखवलेली ही चमक कौतुकास्पद ठरत आहे.या यशाबद्दल बोलताना शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या योग्य नियोजनाची साथ मिळाल्यामुळेच हे यश शक्य झाले आहे. परियशला मोहन परिहार, विलास पऱ्हाड, शंकर सोरमारे, विनोद जाधव, सुभाष शेळके, परमेश्वर उगले, सुहास पाटील, रोहिणी कदम आणि अंजली गोसावी या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!