श्री.सतीश सोनुने, सहायक कृषि अधिकारी ‘तिफण पुरस्काराने’ सन्मानित…

0
IMG-20260429-WA0007

पुणे (बुलढाणा माझा न्युज )येथील तिफन फाऊंडेशनच्या वतीने यंदाचा तिफन कृषी पुरस्कार बुलढाणा येथील सहायक कृषी अधिकारी, श्री.सतीश सोनुने यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व कृषी आयुक्त सुरज पांढरे यांच्या हस्ते सपत्निक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह, पुणे येथे हा सोहळा पार पडला..कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल तिफन फाऊंडेशनच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. कृषी विस्तार, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण तसेच मृदसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय व परिणामकारक कार्य केल्यानेतसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती व शासकीय योजनांची प्रभावी माहिती देऊन उत्पादन क्षमतेत वाढ होईल असे कार्य श्री.सतिश सोनुने यांनी केले आहे.या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. यावेळी डॉ. दिगंबर दुर्गाडे, ऍग्रोवन चे कार्यकारी संपादक रमेश जाधव, कृषि संचालक रफिक नायकवाडी, विनयकुमार आवटे, कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, फाउंडेशनचे समन्वयक सुखदेव जमधडे, अनंत देशमुख, प्रदीप भोर, संतोष पाटील, भूजंग लोकरे, अंजना सोनवलकर, बलभीम आवटे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!