सेवा हक्क दिनानिमित्त प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांचा सन्मान….
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सिंदखेडराजा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व महसूल सहाय्यक श्रीमती भंडारी मॅडम यांचा . मा. डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.हे सिंदखेडराजा उपविभागा करीता कौतुकास्पद आहे सिंदखेडराजा उपविभागामध्ये महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेयर दाखले या सेवा सेवा हक्क अधिनियमानुसार निर्धारित वेळेत व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या. सन 2025–26 या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.या कालावधीत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी श्रीमती भंडारी मॅडम यांनी एकूण सन 24=26 या वर्षात 19,850 दाखले वेळेत वितरित केले. वेळेत सेवा देण्याचे प्रमाण सर्वाधिक राहिल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेयर दाखले हे सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज असून, शैक्षणिक प्रवेशासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. हे दाखले वेळेत उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.विशेष म्हणजे, काही विद्यार्थ्यांना तातडीची गरज भासल्यास प्रा. खडसे यांनी थेट संपर्क साधणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले.तसेच भटक्या-विमुक्त जातीतील नागरिकांसाठी शिबिरांच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे संकलित करून दाखले वितरित करण्यात आले. पारधी वेड्यावर सामाजिक दातृत्व योजनेअंतर्गत नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली.हा सन्मान स्वीकारताना प्रा. संजय खडसे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या कार्याचा गौरव आहे. भविष्यातही याच पद्धतीने सेवा देत राहू.”या कार्यक्रमास गुलाबराव खरात (मुख्य कार्यकारी अधिकारी), सुधीर खांदे (अप्पर जिल्हाधिकारी), सुरेश कव्हळे (निवासी उपजिल्हाधिकारी), सदाशिव शेलार (जिल्हा पुनर्वसन अधिकारी) समाधान गायकवाड उपजिल्हाधिकारी,तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.
