मधुकर शिंदे यांचा एक मे महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण…

0
Screenshot_2026-04-29-20-48-09-38_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेडराजा, जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्चून राबवलेल्या महाजल योजनेचे पळसखेड चवका येथे तीन तेरा वाजले आहेत. संतप्त झालेल्या मधुकर किसन शिंदे यांनी थेट कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग यांना तक्रार अर्ज देऊन भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे.तक्रारीतील स्फोटक आरोप 10 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या अर्जात शिंदे म्हणतात, गावात बांधलेली पाण्याची टाकी पूर्णपणे नादुरुस्त आहे. सिमेंटचे कोन वापरल्याने टाकीला मोठी गळती लागली आहे. पाणीच थांबत नाही. शिवारात भरपूर पाणी असताना विहीर मात्र चुकीच्या ठिकाणी, खडकावर खोदली. त्यामुळे तीही निरुपयोगी ठरली.7 किमी पाईपलाईनचा घोळ गावासाठी 7 किलोमीटर पाईप लाईन मंजूर होती, पण ती बोगस टाकण्यात आली. एकाच नालीमध्ये दोन गावांचे पाईप टाकल्याचा धक्कादायक आरोप शिंदे यांनी केला आहे. पाईप कोणत्या कंपनीचे, किती खोलीचे टाकले याचे इस्टिमेंट मागवले आहे.”बिल दिले तर आमरण उपोषण”*शिंदे यांनी थेट इशारा दिला की, ठेकेदाराची सखोल चौकशी करून त्याचे नाव काळ्या यादीत टाका. कोणतेही बिल अदा करू नका. बिल अदा केल्यास आपले कार्यालय जबाबदार राहील आणि कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल.जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत धडक*हा तक्रार अर्ज जलसंधारण मंत्री मुंबई, आमदार मनोजभाऊ कायंदे आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांनाही पाठवण्यात आला आहे.महाजल योजनेच्या नावाखाली सुरू असलेल्या या कारभारावर प्रशासन काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. टीप शासकीय ठेकेदार शिवानंद मुंडे यांचे तालुका भर योजनेचे व महाजन योजनेचे संपूर्ण काम बोगस आहे याची संपूर्ण चौकशी करून शिवानंद मुंडे यांचे ठेकेदारी चे लायसन रद्द करून रद्द करून त्यांना येथून पुढे कोणतेही काम न देता त्यांना काळे यादीत टाकावे असे मागणी मधुकर शिंदे व अनिल दराडे यांनी संबंधित विभागाकडे केले आहे जर ठेकेदार यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तर एक मे महाराष्ट्र देणे आपल्या कार्यालयासमोर अमरावती करण्यात येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!