जिजाऊ इंटरनॅशनल स्कूलच्या विनायक मोगलची ISRO सहलीसाठी निवड….
सिंदखेडराजा (अनिल दराडे )येथील जिजाऊ इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 3 री चा विद्यार्थी विनायक विजय मोगल याने भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये गरुडझेप घेतली आहे. या प्रतिष्ठेच्या परीक्षेत विनायकने संपूर्ण महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या उल्लेखनीय यशामुळे त्याची ISRO च्या शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे.विनायकच्या या यशाबद्दल शाळेच्या संचालिका डॉ. शिल्पा कायदे मॅडम यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. एस. खार्डे सर तसेच सर्व शिक्षकवृंदांनी विनायकचे अभिनंदन करून स्वागत केले व त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या यशामुळे शाळेतील विद्यार्थी, पालक व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
